Silk, Megha, Smita, Aastad, Nand Kishore, Sharmisthaya and Nominate | रेशम, मेघा, स्मिता, आस्ताद, नंदकिशोर, शर्मिष्ठा झाले नॉमिनेट

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  काल सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवले. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. तसेच कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये बरीच चर्चा देखील झाली. या कार्यामध्ये मेघा, आस्ताद, सई, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे नॉमिनेट झाले. त्यानंतर बिग बॉस यांनी पुष्करला एक विशेष अधिकार दिला ज्याद्वारे तो नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याला सुरक्षित करू शकतो आणि त्याने सईला सुरक्षित केले. त्यानंतर त्याला अजून एक अधिकार दिला ज्यानुसार त्याला एकाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करायचे होते आणि त्याने रेशमला नॉमिनेट केले. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण सुरक्षित होणार ? आणि कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस सदस्यांना “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सोपवणार आहेत. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर बनणार आहेत हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा असणार आहेत. आता “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये काय घडणार ? कोणाचा संयम सुटणार ? कोण संयमाने खेळणार ? जसाजसा फिनाले जवळ येत आहे तसा बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील स्पर्धा वाढताना दिसतेय. आता सामना अटी-तटीचा होताना दिसणार आहे. आतापर्यंत प्रत्येक जण आप-आपल्या ग्रुपमधून खेळत होता आता प्रत्येक स्पर्धक वैयक्तिक पातळीवर खेळताना दिसतील.त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात अधिक रंगत येणार आहे. 

Web Title: Silk, Megha, Smita, Aastad, Nand Kishore, Sharmisthaya and Nominate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.