Silk gave a big deal to Lake Rishika in Big Boss house? | बिग बॉसच्या घरात रेशमने लेक रिशिकाला दिला हा मोलाचा सल्ला?

बिग बॉसच्या घरात रेशम सेठ टिपणीस कायमच आपल्या मुलांची आठवण काढत असल्याचे पाहायला मिळते. साप्ताहिक कार्यात रेशमला बिग बॉसने सुंदर सरप्राईज दिलं.रेशमची लेक रिशिका तिला भेटण्यासाठी आली होती. यावेळी मायलेकींमधील प्रेम आणि घट्ट नातं पाहायला मिळालं. लेकीला पाहताच रेशमला अश्रू अनावर झाले. त्याचवेळी बिग बॉसने रेशमला फ्रीज होण्याचा आदेश दिला. रिलीज होताच रेशम पुन्हा लेक रिशिकाला मिठीत घेतले. जवळपास २ महिन्यांनंतर भेटीचा आनंद दोघी मायलेकींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. दोघींमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रिशिकाने रेशमला नवीन हेअरकट केल्याचे सांगितले. तर बिग बॉसच्या घातून बाहेर येईपर्यंत माझे सगळे पैसे संपवू नकोस असा सल्ला रेशमने लेकीला दिला.यावेळी दोघींमधील घट्ट प्रेमाचं नातं दिसून आलं. आईसोबतच रिशिकाने घरातील प्रत्येक सदस्याशी आपुलकीने संवाद साधला. विशेषतः मेघा आणि रेशम या दोघीही चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात असं रिशिकाने म्हटले. दोघींत बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य असल्याचं सांगत न भांडण्याचा सल्लाही तिने दोघींना दिला. 

Also Read:रेशम टिपणीस हिची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत खास गोष्टी

मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोचा पहिला सीझन रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक सदस्यांचा अंदाज, त्यांच्यातील वाद-विवाद, कधी कधी डोळ्यात तरळणारे अश्रू आणि तितकंच प्रेम यामुळे बिग बॉस मराठी रसिकांना भावतो आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पाहणं रसिकांना भावतंय. दर आठवड्याला विविध टास्क, नॉमिनेशन्स आणि त्यातून निर्माण होणारे तंटे रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. एवढ्या दिवसांत बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता आलेलं नाही. मात्र या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. बिग बॉसने घरातील स्पर्धकांना फ्रीझ – रिलीज हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्याअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी लाभली होती. 
Web Title: Silk gave a big deal to Lake Rishika in Big Boss house?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.