Shubhamangal alert will be done in the love affair with love and affection | ​लव्ह लग्न लोचामध्ये विनय-आकांशाचे होणार शुभमंगल सावधान

झी युवावरील लव्ह लग्न लोचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका सुरू होऊन वर्ष झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये.  प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा, प्रत्येक कलाकाराचा अभिनय, या कार्यक्रमातील प्रत्येक प्रसंग, त्यावर कलाकार घेत असलेली मेहनत यामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. या मालिकेतील राघव, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांशा, श्रीकांत आणि आता नवीन आलेले पण या लव्ह लग्न लोचाच्या कुटुंबात पूर्णपणे मुरलेले ऋता आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देत आहेत. या सगळ्यांच्या आयुष्यात घडणारे सगळेच लोचे आता सर्वांनाच स्वतःचे आपले लोचे वाटू लागले आहेत. या मालिकेच्या कथानकाला आता नवे वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. राघवचे नक्की प्रेम कोणावर आहे? काव्य आणि ऋताचा वाद संपणार का? गावावरून आलेला राजा या कुटुंबात एकरूप होईल का? श्रीकांत खरंच चांगलं वागतोय की नाटक करतोय? आणि सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे विनय आणि आकांशा यांचे लग्न होणार की नाही ??... या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मालिका प्रेक्षकांना लवकरच मालिकेत मिळणार आहेत. मालिकेला मिळणारी ही वळणं प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळूवून ठेवणार आहेत यात काही शंकाच नाही. 
लव्ह लग्न लोचामध्ये आता पुढील भागांमध्ये विनय आणि आकांक्षाच्या लग्नाचा प्रश्न छानप्रकारे सुटणार आहे. सध्या मालिकेत सगळी मंडळी विनय आणि आकांशाच्या लग्नाची तयारी करत आहेत. त्यात आता बॅचलर पार्टी होणार आहे, त्यात लोचे ना होऊन कसे चालेल. आता पाहायला मजा येणार आहे विनय आणि आकांशाच्या लग्नात किती लोचे होतात ते...
 
Also Read : लव्ह लग्न लोचा फेम सिद्धी कारखानीसचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?
Web Title: Shubhamangal alert will be done in the love affair with love and affection
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.