Shreyas Talpade will appear in 'My name is Lakhan' | 'माय नेम इज लखन'मध्‍ये श्रेयस तळपदे दिसणार स्‍त्री वेशात
'माय नेम इज लखन'मध्‍ये श्रेयस तळपदे दिसणार स्‍त्री वेशात

सोनी सब वाहिनीवरील 'माय नेम इज लखन' या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील आगामी भागात श्रेयस तळपदे स्त्री वेशात दिसणार आहे. लखन (श्रेयस तळपदे)चे स्‍वर्गवासी वडिल दशरथ (परमीत सेठी) यांना आपण चांगला मुलगा असल्‍याचे सिद्ध करण्‍याच्‍या मिशनवर आहे. प्रेमळ मुलगा बनण्‍याच्‍या त्‍याच्‍या मिशनमध्‍ये त्‍याला दोन टास्‍क देण्‍यात आले आहेत. एक टास्‍क त्‍याच्‍या आईवडिलांनी दिला आहे आणि दुसरा टास्‍क राधाने (इशा कन्‍सारा) दिला आहे.

लखनची आई पम्‍मी (अर्चनापुरण सिंग) त्‍याला आठवण करून देते की, त्‍याने विमलला स्‍त्री रुपात सजवले होते. तो याबाबत माफी देखील मागायला जातो, पण त्‍याऐवजी त्‍याला २४ तासांसाठी स्‍त्रीप्रमाणे पोशाख परिधान करण्‍याचे आव्‍हान देण्‍यात येते. दुबईला पाठवल्‍या जाणाऱ्या काही मुलींना वाचवण्‍यासाठी त्‍याला नाईलाजाने मूळ रूपात यावे लागले. या मुलींमध्‍ये विमलची बहीण देखील असते. दुसरीकडे राधा (इशा कन्‍सारा) लखनची चुकी दाखवण्‍याचा सतत प्रयत्‍न करत असते. पण लखन तिच्‍या
प्रेमात पडतो आणि तिला प्रेमाची मागणी घालतो. यासाठी त्‍याला पुन्‍हा एक टास्‍क देण्‍यात येतो, तो म्‍हणजे लखनमुळे पाय गमावलेला ऑलिम्पिक अॅथेलीट अरमानची माफी मागणे. लखन अरमानची माफी मागण्‍याचे खूप प्रयत्‍न करतो, पण अरमान सतत त्‍याचा पाणउतारा करतो. हे पाहून लकी भाई (संजय नार्वेकर) लखनला भडकवतो आणि अरमानने त्‍याच्‍यासाठी बोललेल्‍या वाईट शब्‍दांसाठी अरमानवर बंदूक डागण्‍यास सांगतो. लखन मुलींना वाचवण्‍यामध्‍ये आणि विमलकडून माफी मागण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल का? लखन दुष्‍ट गुंड असलेल्‍या त्‍याच्‍या मूळ रुपाकडे परतेल का?
लखनची भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे म्‍हणाला, 'लखन त्‍याच्‍या वडिलांचा चांगला मुलगा बनण्‍याच्‍या मिशनवर आहे. त्‍याच्‍यामते त्‍याचे वडिल या जगात नाहीत. लखनला त्‍याच्‍या लखनगिरीमध्‍ये हे करताना पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल.'
 


Web Title: Shreyas Talpade will appear in 'My name is Lakhan'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.