Shreyas Talpade on small screens after many years !! | श्रेयस तळपदे अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर!!

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. झी युवावरील 'गुलमोहर 'या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस हा अभिनेत्री गिरीजा ओक - गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयश आणि गिरीजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही अनेक मालिका आणि सिरीयल मध्ये काम केले आहे. मात्र आजपर्यत दोघांनीही एकत्र काम केले नव्हते. गुलमोहर ही छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर वर आधारित मालिका आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. ' स्माईल प्लिज ' ही या मालिकेची पहिली कथा असेल.  श्रेयस सतत हसायचं आणि हसवायचं ‘स्माईल प्लीज' म्हणत छोट्या पडद्यावर आगमन करीत आहे.
 
श्रेयस ला त्याच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ' झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, नवे पर्व...युवा सर्व "असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या चॅनेलने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली.  मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेललाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा या चॅनेलने आपल्या कवेत घेतले. त्यामुळेच झी युवा वाहिनीने जेव्हा मला ' गुलमोहर 'या मालिकेतील पहिली कथा ‘स्माईल प्लिज 'या विचारले तेव्हा माझे हो म्हणणे अपेक्षितच होते . या गोष्टीत गिरीजा ओक गोडबोले  , उदय सबनीस आणि उदय टिकेकर माझ्याबरोबर काम करत असून मंदार देवस्थळी सारखे उत्तम दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत आहेत."

गुलमोहर मध्ये नाते संबंधांवर आधारित एक सुंदर अनुभव सोमवारी आणि मंगळवारी अनुभवायला मिळेल. या मालिकेतून अनेक मोठे आणि आवडते कलाकार झी युवाच्या प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. पहिली गोष्ट ही आयुष्यात हसणं कसं आणि किती महत्वाचं असत याचा प्रत्यय देईल. या मालिकेद्वारे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेअभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर येत आहे. 
Web Title: Shreyas Talpade on small screens after many years !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.