In this show Shankar Mahadevan, Diljit Dosanjh and Monali Thakur appear in the role of examiner | या शोमध्ये शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

नाविन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेली कलर्स वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन येत आहे. या शोच्या दुसऱ्या आवृत्ती मध्ये जगभरातील हजारो महत्त्वाकांक्षी गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वात मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. रायझिंग स्टार 2 या रिअॅलिटी शोमध्ये शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर आपल्याला परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

शंकर महादेवन म्हणाले, “तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता यावर माझा गाढ विश्वास आहे. ही एक विचार प्रक्रिया आहे, जी तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरामध्ये गुंतलेली असते. या मंचावर येण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करणाऱ्या रायझिंग स्टार गायकांच्या कहाण्या आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत. धर्म, जात, लिंग कुटंब किंवा शेजारी या सर्वांच्या अडथळ्यांवर या स्पर्धकांनी मात केली आणि त्यांच्या मधुर आवाजाने आमची मने जिंकली.”

तज्ञांच्या पॅनेल मध्ये पुन्हा येत असलेले दिलजित दोसांझ म्हणाले, “प्रत्येकाचे स्वप्न असते पण आवड, उत्साह आणि जबाबदारीने बाकीच्यां मधून ते टॅलेंट उठून दिसते. या सीझनला अवघड परिस्थितीवर मात करून रायझिंग स्टार बनण्याची आशा सोडून न देणारे काही निष्णात टॅलेंट आम्हाला पहायला मिळाले होते.”

यातच पुढे सांगताना, मोनाली ठाकूर म्हणाल्या, “एखाद्या व्यक्तीला मानसिकरीत्या बरे करण्यासाठी संगीत आणि त्याच्या स्वरांचा चांगला उपयोग होता यावर माझी विश्वास आहे आणि त्यामुळे संगीत हे माझ्या मते माझ् जीवनाचा एक भाग आहे. संगीत ही एक थेरपी आहे आणि लोकांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात एक कला म्हणून त्याने मला खूप आनंद दिलेला आहे.”

रायझिंग स्टार 2 ची रुजलेल्या वाटा मोडणारी संकल्पना स्पर्धकाच्या कौशल्य आणि टॅलेंटवर संपूर्णपणे भर देते. वयाची किंवा कोणत्याही बंधनाची अट नसलेला हा शो सोलो, ड्युएट आणि ग्रुप/बँड परफॉर्मन्स साठी खुला आहे. प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करून मुग्ध करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा आवाज त्यांना राष्ट्रीय प्रसिध्दी मिळवून देणार आहे., त्यांच्या पाठिंब्याच्या प्रत्येक मतामध्ये त्यांचे नशीब त्वरित बदलून टाकण्याची ताकद आहे. व्हियाकॉम 18 चा व्हिडिओ ऑन डिमांड मंचाला लाइव्ह व्होटिंग साठी सपोर्ट दिला आहे वूटने, आणि प्रेक्षकांची व्यस्तता शिखरावर पोहचविणाऱ्या, रायजिंग स्टार 2ने  भारतीय प्रेक्षकांना त्यांचा आवडता महत्वाकांक्षी गायक त्याची पार्श्वभूमी विचारात न घेता निवडण्याची ताकद दिली आहे.       

Web Title: In this show Shankar Mahadevan, Diljit Dosanjh and Monali Thakur appear in the role of examiner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.