Sholay Style Holi Celebrations in 'The Voice India Kids' | ​'द वॉईस इंडिया किड्स'मध्ये शोले स्टाइल होळी सेलिब्रेशन्स

&TV वरील सर्वात लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो 'द वॉईस किड्स' या कार्यक्रमात अनोख्या स्टाइलमध्ये होळी सण साजरा केला जाणार आहे. या भागासाठी नुकतेच चित्रीकरण करण्यात आले. अगदी बॉलिवूड चित्रपटांमधील या सणाच्या उत्साहाप्रमाणे उत्साह कार्यक्रमाच्या सेटवर होता. या शोमध्ये शोले स्टाइलमधील 'होळी स्पेशल' एपिसोड पाहायला मिळणार असून या उत्साहामध्ये अधिक भर म्हणून प्रेक्षकांना परीक्षकांसोबतच सूत्रसंचालक देखील पूर्णत: नवीन रूपात दिसणार आहे.
शोले या सुपरहिट चित्रपटामधील दृश्यांच्या आठवणी जाग्या करत द वॉईस इंडिया किड्सचे परीक्षक या सिनेमातील अजरामर व्यक्तिरेखांच्या रूपात दिसणार आहेत. पलक मुच्छल बसंतीच्या वेषात, हिमेश रेशमिया जयच्या वेषात, शान वीरूच्या वेषात दिसणार आहेत आणि आपला लाडका सूत्रसंचालक जय भानुशाली ठाकूरचे रूप परिधान करणार आहे. यासोबतच आपल्या ठाकूरसोबत रामलाल पण असणार आहे. या उत्साहपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी जयसोबत नितेश शेट्टी देखील असणार आहे. नितेश लवकरच नवीन डान्स रिअॅलिटी शो 'हाय फिव्हर... डान्स का नया तेवर' या कार्यक्रमात प्रियांशू जोरासोबत सूत्रसंचालन करणार आहे.
पलक, हिमेश, शान, जय आणि नितेशने अगदी उत्तमरित्या आपल्या भूमिका साकारल्या असून या कार्यक्रमात एक छोटेसे स्कीट देखील सादर करण्यात आले. या स्कीटमध्ये गब्बरचे गोंडस रूप धारण केलेला पापोन म्हणतो की मी ऑर्डर केलेली पिचकारी बंदूक मला मिळाली नसल्यामुळे मी रामगडमध्ये कोणालाच होळी खेळायला देणार नाही. तो पलक (बसंती), शान (वीरू) आणि हिमेश (जय) यांना रस्सीने बांधून ठेवणार आहे. त्यांची सुटका करण्यासाठी ठाकूर आणि रामलाल येणार आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर देखील गब्बर त्यांना सोडणार नाहीये आणि शेवटी मुलांची सेनाच आपल्या आवडत्या परीक्षकांना सोडवण्यासाठी येणार आहे.
परीक्षकांनी या सुपरहिट चित्रपटाला पुन्हा उजाळा देताना खूप मौजमजा केली. त्यामुळे कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे की, प्रेक्षक सुद्धा 'द वॉईस इंडिया किड्स'मधील या संगीतमय होळी स्पेशल कार्यक्रमाचा आनंद घेतील.

Also Read : 'द वॉईस इंडिया किड्स'मध्‍ये सलमान खानने दिले ऑडिशन!

 
Web Title: Sholay Style Holi Celebrations in 'The Voice India Kids'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.