Shocking: Two years of education in Kareena Kapoor's 'Anasrini' mother Alka Kaushalya! | Shocking : करिना कपूरची आॅनस्क्रिन आई अलका कौशलला ‘या’ प्रकरणात झाली दोन वर्षांची शिक्षा!!

ही बातमी टीव्ही जगतासाठी धक्कादायक आहे. कारण छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कौशल हिला दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. पंजाबच्या संगरूर न्यायालयाने अलकाला चेक बाउंसप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. अलकाबरोबर तिची आई सुशीला बडोला हिलादेखील ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५० लाखांचा चेक बाउंस केल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. 

अमर उजालाचे वकील सुखवीर सिंग यांनी सांगितले की, लागडिया गावातील रहिवासी अवतार आणि अलका यांची गेल्या काही दिवसांपासून ओळख होती. अलका आाणि तिची आई सुशीला यांनी अवतारकडून एका मालिकेची निर्मिती करण्यासाठी ५० लाख रुपये उसणे घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतर अलकाकडून पैसे मिळाले नसल्याने अवतारने तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी अवतारने अलकाला २५-२५ लाखांचे दोन धनादेश दिले. मात्र हे दोन्ही चेक बाउंस झाले. त्यामुळे अवतारचा चांगलाच पारा चढला. त्याने थेट मालेरकोटरा पोलीस ठाण्यात दोघींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पुढे अलका आणि तिची आई जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी संगरूर न्यायालयात अपील केली. या अपीलच्या माध्यमातून आम्ही अवतारकडून पैसे घेतलेच नसल्याचा सुरुवातीला बनाव केला. परंतु जेव्हा याविषयीचा सखोल तपास करण्यात आला, तेव्हा त्यामध्ये अलका आणि तिची आई सुशीला हिने अवतारकडून पैसे घेतल्याचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने अलका आणि तिची आई सुशीला यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

अलका कौशल हिने ‘स्वरागिनी’ आणि ‘कुबूल है’ या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याव्यतिरिक्त सलमान खान स्टारर ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात तिने करिना कपूर-खानच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच अलकाने कंगना रानौत स्टारर ‘क्वीन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अलका प्रसिद्ध अभिनेता वरुण बडोला यांची बहीण आहे. आता या प्रकरणाला आणखी काय वळण मिळणार याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहचविणार आहोतच. 
Web Title: Shocking: Two years of education in Kareena Kapoor's 'Anasrini' mother Alka Kaushalya!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.