'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण, राणादा करणार गुडबाय?, पहा राणादाचा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 12:33 PM2019-06-19T12:33:26+5:302019-06-19T12:33:54+5:30

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण आल्याचं झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमधून पहायला मिळतंय.

Shocking track in Tuzyat Jeev Rangala Serial, Ranada do goodbye to serial, see his video | 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण, राणादा करणार गुडबाय?, पहा राणादाचा हा व्हिडिओ

'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण, राणादा करणार गुडबाय?, पहा राणादाचा हा व्हिडिओ

googlenewsNext


गेल्या काही दिवसांपासून 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादा एक्झिट घेणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याबाबत अधिकृतरित्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नव्हता. मात्र झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आणि त्यात गुडबाय राणादा असं म्हटलंय. 


झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये धक्कादायक वळण आल्याचं झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमधून पहायला मिळतंय. हा प्रोमो शेअर करून गुडबाय राणादा असंही लिहिण्यात आलंय. या प्रोमोत राणादाला नंदिता वहिनीचा डाव समजतो. त्यात ती हा ठोकळा माझ्यात ताब्यात राहणार असे बोलत असते. हे राणादा ऐकतो आणि यापुढे तुमचं तोंडदेखील पाहणार नाही असं सांगून तिथून निघून जातो. 


त्यानंतर नंदिता वहिनी पाहिजे तेवढे किंमत देते पण हे काम झालं पाहिजे असं बोलते. त्यानंतर काही लोक राणादा मारतात आणि त्याला नदीत फेकून देतात. राणादाच्या शोधात आलेली अंजली राणादाला नदीत पडताना पाहते. राणादाचा मृत्यू होईल की तो बचावेल, हे मालिकेच्या आगामी भागातच स्पष्ट होईल. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणादा हा जख्मी होणार असून काही दिवसांसाठी तो मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. पण ही एक्झिट केवळ महिन्याभरासाठी असून तो या मालिकेत परतणार आहे. पण या मालिकेत राणाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राणाचे वजन कित्येक किलो कमी झालेले असून एक वेगळा राणा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचप्रमाणे या मालिकेच्या कथानकात देखील बदल होणार आहे.

या मालिकेतील खलनायिका नंदिती वहिनी सुधारणार असून ती आता सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच राणा दा राहात असलेला वाडा देखील खूप बदलणार असून याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. 

Web Title: Shocking track in Tuzyat Jeev Rangala Serial, Ranada do goodbye to serial, see his video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.