Shocking : इंडियन आयडॉलच्या ‘या’ एक्स स्पर्धकाला चोरीच्या प्रकरणात केली अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 10:50 AM2017-10-29T10:50:07+5:302017-10-29T16:20:07+5:30

१२५ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात प्रत्येकजण स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचीच ही इच्छा असते की, ...

Shocking: Indian Idol's 'The' X Contest! | Shocking : इंडियन आयडॉलच्या ‘या’ एक्स स्पर्धकाला चोरीच्या प्रकरणात केली अटक!

Shocking : इंडियन आयडॉलच्या ‘या’ एक्स स्पर्धकाला चोरीच्या प्रकरणात केली अटक!

googlenewsNext
५ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात प्रत्येकजण स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांचीच ही इच्छा असते की, कोट्यवधी लोकसंख्येमध्ये आपली वेगळी छाप पडावी. असेच स्वप्न उराशी बाळगून सुरज बहादूर मुंबईला पोहोचला होता. होय, सुरजने इंडियन आयडॉलमध्ये प्रवेश करून असे स्वप्न बघितले होते की, एक दिवस तो त्याच्या आवजाने संपूर्ण भारतवासीयांचे मने जिंकणार. मात्र आज सुरजबाबत जी बातमी समोर आली आहे, ती वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, सुरजला दिल्लीमध्ये पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. 

विशेष म्हणजे सुरजने गुन्हा कबूल केला असून, चैनीचे आयुष्य जगण्याच्या हेतुनेच चोरी केल्याचे म्हटले आहे. सुरजने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मिळविली आहे. फर्राटेदार इंग्रजी बोलणारा सुरज तायक्वांदो स्पर्धेचा राष्टÑीय चॅम्पियनदेखील आहे. पोलिसांनी सुरतसह त्याच्या तीन साथीदारांनाही दिल्लीच्या रणहौला परिसरातून अटक केली. सुरजला त्याच्या गु्रपमध्ये फायटर नावाने ओळखले जाते. 



डीसीपी एम.एन. तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीने तीन डझनांपेक्षा अधिक चोरीच्या घटना कबूल केल्या आहेत. सुरजजवळून एक पिस्तूल, काळ्या मिर्चीचा स्प्रे आणि एक स्कूटरही हस्तगत करण्यात आले आहे. त्याचबरोबर याविषयीचादेखील खुलासा करण्यात आला की, त्याला ब्रॅण्डेड कपडे आणि शूजचा शौक आहे. याशिवाय सुरजला ड्रिक करण्याचीही सवय असल्याने तो नियमितपणे क्लब जात होता. त्याचबरोबर सुरजचे बºयाचशा मुलींशी अफेअरही सुरू होते. त्याच्या परिवाराने त्याची वागणूक बघून त्याला घराबाहेर काढले होते. 

Web Title: Shocking: Indian Idol's 'The' X Contest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.