Shocking...! या अभिनेत्रीच्या गाडीवर दारूड्यांनी केला हल्ला, एकटीनं केला सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 04:27 PM2019-03-23T16:27:24+5:302019-03-23T16:28:28+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्नासाठी होळीचा दिवस खूपच भयानक होता. तिच्या कारवर दहा ते पंधरा दारूड्यांनी हल्ला केला. ही घटना मालाड जवळ संध्याकाळी ७ वाजता घडली.

Shocking ...! The actress was attacked by the villagers on the same day | Shocking...! या अभिनेत्रीच्या गाडीवर दारूड्यांनी केला हल्ला, एकटीनं केला सामना

Shocking...! या अभिनेत्रीच्या गाडीवर दारूड्यांनी केला हल्ला, एकटीनं केला सामना

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्नाला होळीच्या दिवस खूप भयानक होता. या दिवशी तिला एका वाईट घटनेचा सामना करावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्या कारवर दहा ते पंधरा दारूड्यांनी हल्ला केला. ही घटना मालाड जवळील परिसरात घडली. त्यावेळी जवळपास संध्याकाळचे सात वाजले होते. इतकेच नाही तर त्या दारूड्यांनी तिच्या वाहन चालकालादेखील मारहाण केली.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार,चाहत खन्नाने लगेचच पोलिसांना फोन केला. कारण ही घटना घडत असताना कोणीही तिच्या मदतीसाठी आले नाही. वाहन चालकाला मारहाणीपासून वाचवण्यासाठी स्वतः ती त्या दारूड्यांशी सामना करत होती. तिने त्यांना चप्पलाने मारायला सुरूवात केली.

चाहतच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वीच चाहतच्या आईचे निधन झाले. तिने सोशल मी़डियावर भावनिक पोस्टदेखील शेअर केली होती. तर गेल्या वर्षी ती तिचा पती फरहान मिर्झापासून विभक्त झाली आहे. तिने फरहानवर शारिरीक व मानसिक त्रासाचे गंभीर आरोप केले होते. चाहता दोन मुली आहेत.

बॉम्बे टाइम्सशी केलेल्या बातचीतमध्ये चाहतने सांगितले की, ती बराच काळापासून लग्नाला घेऊन खूश नव्हती. तिने नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. तिने त्याच्यासोबत कोणत्याही किमतीत राहायचे नसल्याचे सांगितले होते.
प्रोफेशन लाइफबद्दल सांगायचे तर चाहत खन्नाने बडे अच्छे लगते है, कुबूल है या मालिकेत काम केले आहे. तसेच चित्रपटात देखील काम केले आहे.

Web Title: Shocking ...! The actress was attacked by the villagers on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.