'इश्क में मरजावा'मध्ये 'या' भूमिकेत दिसणार शोएब इब्राहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:03 PM2018-10-17T16:03:34+5:302018-10-18T06:30:00+5:30

सूड आणि दुष्टावाच्या विविध छटा असलेली कलर्सची लोकप्रिय प्रेमकथा इश्क में मरजावा रोमांचक वळण येणार आहे. आगामी भागात अभिमन्यू नावाच्या एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे.

Shoaib Ibrahim to enter Ishq Mein Marjawan as Abhimanyu | 'इश्क में मरजावा'मध्ये 'या' भूमिकेत दिसणार शोएब इब्राहीम

'इश्क में मरजावा'मध्ये 'या' भूमिकेत दिसणार शोएब इब्राहीम

googlenewsNext

सूड आणि दुष्टावाच्या विविध छटा असलेली कलर्सची लोकप्रिय प्रेमकथा इश्क में मरजावा रोमांचक वळण येणार आहे. आगामी भागात अभिमन्यू नावाच्या एका नव्या पात्राचा प्रवेश होणार आहे. ही भूमिका शोएब इब्राहिम साकारणार आहे. अभिमन्यूच्या प्रवेशामुळे आरोही, दीप आणि ताराच्या जीवनात प्रचंड उलथापालथ होणार आहे.

जेव्हा आरोही तिचे बाळ दीपकडे सोपवत असते तेव्हा तिला दीपच्या दुष्ट भावना कळून येतात. धक्का बसलेली आणि उध्वस्त झालेली आरोही रायचंद मॅन्शनमधून पळून जाऊन तिच्या बाळाला वाचविण्याचे ठरविते. तिच्या जीवनावरील संकट, आणि कोठे जायचे हे माहित नसलेल्या तिला वाचविण्यासाठी अभिमन्यू पुढे येतो. तो आरोहीला तिच्या पायावर उभे राहण्यात आणि तिला कलरीपयट्टूची कला शिकवून दीपच्या दुष्ट भावनांचा सूड घेण्यास मदत करणार आहे.

या भूमिकेविषयी बोलताना, शोएब इब्राहिम म्हणाला, “कलरीपयट्टू व्यावसायिक असणाऱ्या अभिमन्यूची भूमिका मिळाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. मी कलर्ससोबत खूप वेळानंतर काम करतो आहे त्यामुळे उत्सुकता दुहेरी आहे. ही माझ्यासाठी अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे. हे पात्र खऱ्या अर्थाने साकारण्यासाठी मी कलरीपयट्टूची कला शिकत आहे. या कलेवर मी अतिशय मेहनत घेत आहे आणि मी सांगू शकतो की त्याचे फळ सुध्दा चांगले असेल. इश्क में मरजावा ने नेहमीच प्रेक्षकांना कलाटणी व वळणांनी प्रत्येक एपिसोड मध्ये आकर्षित केले आहे आणि त्यात सहभागी होण्यात मला आनंद आहे. मला आशा आहे की माझा हा नवा अवतार माझ्या चाहत्यांना आवडेल आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मी कठोर परिश्रम करत आहे.”
 

Web Title: Shoaib Ibrahim to enter Ishq Mein Marjawan as Abhimanyu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.