Shilpa Tiwari's 'Onscreen Girl' on the Road to Bollywood? | पलक तिवारी नंतर श्वेता तिवारीची 'ही' ऑनस्क्रिन मुलगी बॉलिवूडच्या वाटेवर?

'कसौटी जिंदगी की'ही मालिका आजही सा-यांना आठवत असणारच या मालिकेचे टायल साँग असो किंवा मग या मालिकेतील कलाकार असो रसिक या मालिकेचे चाहते बनले होते.या मालिकेतील बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेली श्रिया शर्माला आजही रसिक विसरलेले नाहीयेत. छोट्या पडद्यावर श्रिया झळकत नसली बालकलाकार श्रियाला आजही रसिक विसलेले नाहीये. त्यामुळे तिचे इतर जुन्या मालिका किंवा सिनेमा पाहताच 'कसौटी जिंदगी की' मधली छोटी स्नेहा नाही आठवली तरच नवल.श्वेता तिवारीच्या मुलीच्या भूमिकेत श्रियाने  स्नेहाही भूमिका साकारली होती.मालिकेत तिचा क्युटनेसमुळे ती सा-यांचीच फेव्हरेटही बनली होती. आता छोटी स्नेहा मोठी झाली आहे.नुकतेच श्रियाने तिचे काही ग्लॅमरस अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते श्रियाला कमेंटस आणि लाईक्स देताना दिसतायेत. श्रियाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये 20 वर्षीय श्रिया व्हाइट शर्टमध्ये बोल्ड लूक देताना दिसतेय.या फोटोशूटमध्ये श्रियाचा रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईलमुळे या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे.


'कसौटी जिंदगी की' मालिकेतून प्रकाशझोतात आलेली श्रिया 'कन्हैया', 'झूठ बोले कौआ काटे', 'कॅरी ऑन शेखर', 'गॅलेक्सी ऑफ स्टार्स', 'गुमराह: अँड ऑफ इनोसन्स', 'कनफेशन ऑफ एन इंडियन टीनएजर' आणि 'क्या आप पांचवी पास से तेज हैं' या मालिकांमध्ये  काम केले आहे.श्रियाने हिंदीमध्ये आतापर्यंत 'लागा चुनरी में दाग', 'थोडा प्यार थोडा मॅजिक', 'प्रेम का गेम' , 'नॉक आउट', 'चिल्लर पार्टी' या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय 'जय चिरंजीवा' , 'डोकुडू'  'राचा', 'टुनेगा-टुनेगा'  या तेलुगु आणि काही कन्नड चित्रपटांमध्येही  काम केले आहे.हिंदी चित्रपट-मालिकांसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता स्नेहा काहीतरी वेगळे करायची इच्छा आहे.आता बॉलिवूडच्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रियाला बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्याची इच्छा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे श्रिया स्वतःवर खूप मेहनत घेताना दिसतेय, बोल्ड लूक करत तिने केलेले हे खास फोटोशूट तिचे लक्ष बहुदा बॉलिवूडच आहे असंच दिसत आहे.
Web Title: Shilpa Tiwari's 'Onscreen Girl' on the Road to Bollywood?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.