Shilpa Shinde complains of sexual assault registered against Sanjay Kohli | ​भाभाजी घर पर है फेम शिल्पा शिंदेने संजय कोहली यांच्या विरोधात नोंदवलेली लैंगिक अत्याचाराची तक्रार घेतली मागे

भाभाजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभी या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदेला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेतील सही पडके है हा तिचा संवाद तर चांगलाच गाजला होता. या मालिकेची निर्माती बिनेफर कोहली आणि त्यांचे पती संजय कोहली यांच्यासोबत वाद झाल्यामुळे शिल्पाने या मालिकेला रामराम ठोकला होता. या मालिकेच्या निर्मात्यांकडून मानसिक त्रास होत असल्याने ही मालिका सोडण्याचे मी ठरवले असल्याचेही तिने त्यावेळी म्हटले होते. तसेच तिने या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला होता. तिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, मी मालिकेत काम करत असताना मला मानसिक छळ सहन करावा लागला. मी डिप्रेशनमध्ये होते. इंडस्ट्रीतमधील अनेक महिला ही गोष्ट बोलण्यासाठी घाबरतात. पण आज त्यांची प्रतिनिधी म्हणून ही गोष्ट उघडपणे सांगत आहे. या कार्यक्रमाचे निर्माते संजय यांनी मला अनेकवेळा सेक्सी म्हटले. तसेच त्यांनी माझी इच्छा नसतानाही मला अनेकवेळा अलिंगन दिले. माझ्या शरीराला हात लावला. पिंकी पाटवा नावाच्या मेकअप मनने संजय यांना हे सगळे माझ्यासोबत करताना पाहिले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी पिंकीला नोकरीवरून काढण्यात आले. शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता तिने ही तक्रार मागे घेतली असल्याचे म्हटले जात होते. 
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात शिल्पाने मालिकेच्या निर्मात्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली होती. पण आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचे विजेतेपद नुकतेच शिल्पाने मिळवले आहे. या कार्यक्रमामुळे तिला सध्या चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याविषयी संकेत दिले होते. तिने म्हटले होते की, मी केलेल्या कामाचे मानधन मला मिळालेले नव्हते. पण आता माझे पैसे मला परत मिळाले आहेत. त्यामुळे केस पुढे नेण्यात फारसा अर्थ नाही. 
शिल्पाला भाभाजी घर पर है या मालिकेतील तिच्या भूमिकेचे पैसे मिळाल्यामुळे तिने आता निर्माते संजय कोहली यांच्याविरोधात दाखल केलेली केस मागे घेतली असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read  : शिल्पा शिंदेने तिच्या लग्नाविषयी केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर!
Web Title: Shilpa Shinde complains of sexual assault registered against Sanjay Kohli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.