Shilpa Shetty, Dr. Balacsing Act to Michael Musley | शिल्पा शेट्टीने डॉ. मायकेल मुस्ली यांना शिकवला बॅलेन्सिंग अॅक्ट

बॉलिवूडची दिवा शिल्पा शेट्टीची नुकतीच वैद्यकीय पत्रकार डॉ. मायकेल मुस्ली यांच्याशी भेट झाली आणि या भेटीत त्यांनी आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित असलेल्या काही कथित पुराणकथा मोडीत काढल्या. दोन पुस्तकांची लेखिका असलेल्या आणि जगभरात योगा प्रसिद्ध करणाऱ्या या अभिनेत्रीने न्यूयॉर्कच्या उत्कृष्ट लेखक डॉ. मायकेल मुस्ली यांना यावेळी योगा शिकवला. आजच्या जगात कशा प्रकारे आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे याच्याबद्दल देखील त्यांनी यावेळी काही टिप्स एकमेकांना सांगितल्या. फिटनेससंदर्भात शिल्पा शेट्टीने सांगितले, “भारतामध्ये. डॉ. मायकेल मुस्ली यांचे स्वागत करताना खूप आनंद होतो आहे. आठवड्यातून पाच दिवस खावे आणि दोन दिवस उपवास करावा हे तत्त्व शोधून काढणारा हा माणूस आहे. मी गेल्या बराच काळापासून हे करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण याचे शरीराला खूप फायदे होतात.” 
अंडी, तूप, नारळाचे तेल, हळद आणि फळे अशा प्रसिद्ध भारतीय खाण्याच्या पदार्थाच्या संदर्भात असणाऱ्या बऱ्याच गैरसमज, तसेच व्यायामापूर्वी करण्याचे वॉर्म अप आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या फायद्यांबद्दल देखील ती यावेळी बोलली आणि यावेळी मायकेलला काही योगाचे प्रकारदेखील तिने शिकविले. यावेळी तिने केलेला बॅलेन्सिंग अॅक्ट हा तर विसरून चालणारच नाही. याविषयी मायकेल मुस्ली सांगतात, “भारतामध्ये परत येऊन आणि अतिशय उत्साही आणि मैत्रीपूर्ण अशा शिल्पा शेट्टीसह पदार्थ आणि फिटनेससंदर्भातील गैरसमज दूर करून खूप बरे वाटले. भारतात वाढत असलेल्‍या मधुमेहाच्या प्रमाणाबद्दल मला फार काळजी वाटते आहे. बरेच लोक कोणतेही शारिरीक व्यायाम करत नसल्यामुळे हे उद्धवते आहे. जाडी कमी केल्यास मधुमेहाची जोखीम नक्कीच कमी होईल आणि शारिरीक बदल घडण्यास मदत होईल. उत्तम आरोग्य आणि जीवनासाठी काही शारिरीक व्यायाम करण्यात निदान तरूणाईने तरी आता पाऊल उचलायला हवे असे मला वाटते.”
डॉ. मायकेल मुस्ली हे प्रसिद्ध टीव्ही सादरकर्ते असून पुरस्कार विजेते वैद्यकीय पत्रकार आहेत, जे भारतामध्ये माहितीपुरस्सर वाहिनी, सोनी बीबीसी अर्थचे पहिले वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शो ‘ट्रस्ट मी आय अम डॉक्टर’, ‘मीट द ह्युमन्स’, ‘द ट्रूथ अबाऊट एक्स्झर्साईज’ इत्यादी गाजले असून भारतामध्ये केवळ सोनी बीबीसी अर्थवर त्याचे प्रसारण करण्यात येते.

Also Read : सुपर डान्सर या कार्यक्रमात दलेर मेहंदीने शेअर केले शिल्पा शेट्टीचे सिक्रेट
Web Title: Shilpa Shetty, Dr. Balacsing Act to Michael Musley
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.