Shekhar left silence, saying, 'I am the only one to work on the expedition' | शेखरने सोडले मौन,म्हणाला विशालह काम करणे हेच माझ्या हिताचं

गेल्या काही वर्षापासून विशाल -शेखर यांच्यात मतभेदामुळे दोघांचे एकमेकांशी पटत नसल्याचे अनेकदा बातम्या आल्या आहेत.या दोघांच्या वादामुळेच हे जास्त चर्चेत राहिले.वारंवार दोघांना त्यांच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारले जायचे.मात्र दरवेळी दोघांनीही यावर काहीही न बोलणेच पसंतच केले.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मात्र शेखरने आपले मौन तोडले आणि सांगितले की, हे खरे आहे की,विशाल आणि माझ्यात आनेकदा भांडणं आणि मतभेद झालेले आहेत.किंबहुना आता लवकरच पुन्हा एकदा आमच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर आम्ही एका रियुनियन कार्यक्रमात एकत्र काम करणार आहोत.एकमेकांना समजून घेण्यात आम्हाला 20 वर्षं लागली असून आता अशा फुटीच्या बातम्यांना खोटं ठरविण्यासाठी आम्ही पुढची दोन दशकं एकत्र राहणार आहोत.आम्ही दोघेही सर्जनशील तसेच विक्षिप्तही आहोत,पण उत्तम काम करण्यावर आम्ही लक्षकेंद्रित करतो. आमच्यात भांडणं झाली असली,तरी आमचं काम अधिक चांगल्याप्रकारे होण्यासाठीच ते झालं असेल असे मी मानतो.परंतु एकत्र काम करणं हे आमच्या हिताचं आहे,असं मला वाटतं. आम्ही एकत्र काम करत तेव्हा ते काम  अधिक चांगलं होतं.आम्ही दोघं एकत्र असल्यावर चांगल संगीत निर्माण करू शकतो.विशाल हा माझा जवळचचा सहकारीच नव्हे, तर माझ्या कुटुंबाचाही एक सदस्य आहे. त्याच्या आयुष्यात काहीही घडलं तरी मी त्याच्या पाठीमागे कायमच उभा राहीन असे सांगितले.त्यामुळे आता या दिलेल्या या उत्तरावर कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी आशा व्यक्त करतो असेही त्याने सांगितले.

पडद्यामागे राहून आपल्या कामाद्वारे आपली ओळख  निर्माण करणारासंगीतकार शेखर रावजियानीने आता कॅमे-यासमोर येण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही वर्षांपासून शेखरने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो गाणीही लिहू लागला असून आता त्याने काही रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहण्यास सुरूवात केली आहे.सध्या तो ‘ओम शांती ओम’ या भक्तिसंगीतावर आधारित रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा आणि कनिका कपूर यांच्या जोडीने एक परीक्षक म्हणून काम पाहात आहे.
Web Title: Shekhar left silence, saying, 'I am the only one to work on the expedition'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.