Sheen Das and Parul Chaudhary in Piya Albella are in real life, Best Friends | ​पिया अलबेला या मालिकेतील शीन दास आणि पारुल चौधरी खऱ्या आयुष्यात आहेत बेस्ट फ्रेंड्स

पिया अलबेला या मालिकेत शीन दास पूजा ही भूमिका साकारत आहे तर पारुल चौधरी नीलिमा या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत शीन नायिकेची तर पारुल ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत नेहमीच पारुल शीन विरोधात काही ना काही कारस्थानं करताना दिसते. पूजा आणि नीलिमा या मालिकेत एकमेकांच्या शत्रू दाखवल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. ही मालिका सुरू होऊन केवळ सहा महिने झाले आहेत. पण या सहा महिन्यात त्यांच्यात खूप चांगली मैत्री निर्माण झाली आहे. 
पिया अलबेला या मालिकेच्या लूक टेस्टच्या वेळी त्या दोघांची ओळख झाली होती. पारुल आणि शीना या सुरुवातीला रूम देखील शेअर करत होत्या. त्या दोघींचे ट्युनिंग खूपच छान आहे.
शीन आणि पारुल दोघांनाही भाऊ नसल्याने या दोघींनी रक्षाबंधनच्या दिवशी एकमेकांना राखी बांधली आणि एक नवे नाते निर्माण केले. याविषयी शीना सांगते, आपल्या भारतीय परंपरेनुसार भावाला राखी बांधली जातो. पण आम्हाला दोघांनाही भाऊ नाहीये. पारुल ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही दोघी एकमेकींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो. चित्रीकरणाच्या वेळी तर आम्ही एकत्र असतो. पण त्याचसोबत चित्रीकरण नसतानादेखील आम्ही एकत्र जेवायला जातो. खूप साऱ्या गप्पा मारतो. त्यामुळे आम्हीच एकमेकींना राखी बांधायचे ठरवले. राखी ही केवळ मुलालाच का बांधायची मुलीदेखील एकमेकांची रक्षा करू शकतात असे मला वाटते. आता दरवर्षी एकमेकांना राखी बांधण्याचे आम्ही ठरवले आहे.

Also Read : पिया अलबेला या मालिकेतील अक्षय म्हात्रेला करावे लागले रुग्णालयात दाखल 
Web Title: Sheen Das and Parul Chaudhary in Piya Albella are in real life, Best Friends
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.