Shashank Ketkar and his wife Priyanka Dhawale shared what specials have been shared today | शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका ढवळेने आज काय स्पेशलमध्ये शेअर केले सिक्रेट्स

नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. बऱ्याच लोकांना तर दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची देखील आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे की वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अशाच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी घेऊन आला आहे “आज काय स्पेशल”. या कार्यक्रमामध्ये प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांचे प्रतिनिधित्व करत असून बरेच सुप्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमामध्ये येऊन गेले. या कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ करून प्रेक्षकांची मने जिंकली. मकर संक्रातीनिमित्त मराठी मनोरंजन क्ष्रेत्रातील प्रेक्षकांचा लाडका शशांक केतकर त्याच्या पत्नी प्रियांका सह या कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहे. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले.
शशांक आणि प्रियांकाचे नुकतेच लग्न झाले असून त्यांची ही पहिलीच मकर संक्रात आहे. कार्यक्रमामध्ये दोघांनी प्रशांत दामले यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांची धमाल मस्ती प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. आज काय स्पेशल या विशेष भागामध्ये शशांक आणि प्रियांकाने चविष्ठ, रुचकर असे पदार्थ देखील बनवले. शशांकने भोगीची भाजी तर प्रियांकाने तिळगुळचे लाडू बनवले. पदार्थ बनवताना प्रशांत दामललेंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली. शशांकला कुकिंगची खूप आवड आहे आणि त्याने बनवलेले मोमोज आणि चायनीज प्रियांकाला खूप आवडते तर प्रियांकाला केक बनवायला खूप आवडतो. याचबरोबर शशांक प्रियांकचे कौतुक करताना दिसला. त्याला प्रियांकाची स्माईल खूप आवडते असे त्याने आवर्जून सांगितले. याचबरोबर दोघांनी एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी देखील सांगितल्या. शशांक म्हणाला, प्रियांकाला खाण्याची आवड आहे. त्यामुळे ती जंक फूड खूप खाते तिने फिटनेस कडे लक्ष द्यायला पाहिजे तर प्रियांकाची इच्छा आहे शशांकने भरपूर काम करावं म्हणजे तिला देखील त्याच्यासोबत खूप फिरता येईल. लग्नाच्या वेळेसची आठवण विचारली असता प्रियांका सांगते, तिला केळवण हा प्रकार खूप आवडला कारण या दरम्यान आवडीच्या अनेक गोष्टी खायला मिळाल्या. प्रियांकाला मकर संक्रातीच्या विशेष भागानिमित्त काळ्या रंगाची साडी कार्यक्रमाच्या टीमकडून भेट म्हणून देण्यात आली. 

Also Read : जाणून घ्या कसे सुरू झाले शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे प्रेमप्रकरण

Web Title: Shashank Ketkar and his wife Priyanka Dhawale shared what specials have been shared today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.