Shankar Mahadevan says people have got the platform due to the reality show | शंकर महादेवन म्हणतो , रिअॅलिटी शोमुळे लोकांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे

शंकर महादेवनच्या ब्रेथलेस गाण्याने रसिकांवर मोहिनी घातली. दिल चाहता है सारख्या चित्रपटाला दिलेले संगीत आणि गायलेली गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटात गाणी गाण्यासोबतच या चित्रपटात अभिनयदेखील केला आणि आता तो रायजिंग स्टार या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

अनेक सिंगिंग रिऍलिटी शो सध्या छोट्या पडद्यावर येत आहेत त्यात रायजिंग स्टार या कार्यक्रमाचे काय वेगळेपण आहे?
कोणत्याही रिऍलिटी शो मध्ये स्पर्धकासाठी वोट करण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस मिळतात. पण या शो मध्ये कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षकांना वोट करायचे आहे हे वेगळेपण आहे.

एक गायक असताना परिक्षकाची भूमिका साकारणे सोपे आहे की कठीण आहे?
परीक्षण करणे कठीण असते असे  मला वाटत नाही आणि आपल्या देशात खूप चांगले टायलेंट आहे. त्यामुळे परीक्षण करताना कोणाची निवड करू आणि कोणाचे नाही असा दहा वेळा विचार करावा लागतो.

रिऍलिटी शोचा फायदा होतो असे तुला वाटते का?
रिऍलिटी शोमुळे लोकांना प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता येत आहे आणि यामुळे त्यांना भविष्यात संधी देखील मिळत आहेत. आज बॉलिवूड मध्ये कमीत कमी 20 तरी गायक या रिऍलिटी शो च्या माध्यमातून आले आहेत. त्यामुळे याचा लोकांना नक्कीच फायदा होतो.

कार्यक्रमाच्या ऑडिशनचा अनुभव कसा होता?
ऑडिशनला भारतातील वेगवेगळ्या भागातील लोक आले होते. त्यांचे संगीतासाठी असलेले पॅशन पाहून आम्ही सगळे थक्क झालो होतो.

दिलजीत, मोनाली ठाकूर आणि तू या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत ऑडिशन दरम्यान तुमच्यात स्पर्धकांच्या निवडीवरून काही वाद झालेत का आणि वाद झाल्यास तुम्ही ते कशाप्रकारे मिटवता?
प्रत्येक व्यक्तीचे मत हे वेगवेगळे असते. मला एखादी गोष्ट आवडेल, ती दुसऱ्याला आवडेलच असे नाही. तसेच स्पर्धकांच्या बाबतीत देखील सगळ्या परिक्षकांचे एक मत असणे कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात सगळ्या परीक्षकांचे एक मत होतच नाही. आमच्यात एक मत होत नसल्यास मी, दलजीत आणि मोना चर्चा करतो आणि त्यातून मार्ग काढतो.
Web Title: Shankar Mahadevan says people have got the platform due to the reality show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.