Shani's role is to play Rohit Khurana in the series | कर्मफलदाता शनी या मालिकेत ​रोहित खुराणा साकारणार शनीची भूमिका

कलर्सचा वाहिनीवरील कर्मफलदाता शनी या पौराणिक मालिकेला सध्या प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत  जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर सलील अंकोलाने सुर्यदेवाची भूमिका साकरली आहे.शनीदेवाची भूमिका कार्तिकेय मालवीयने या बालकलाकारने साकरली आहे. आता ही मालिका दहा वर्षांचा लीप घेणार असून या मालिकेत रोहित खुराणा शनीदेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील ही भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. अनेक कलाकारांचे ऑडिशन घेतल्यानंतर या भूमिकेसाठी रोहितच योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे पटले. कर्मफलदाता शनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे रोहित खुराणा खूपच खूश होता. तो या भूमिकेविषयी सांगतो,  “मी या भूमिकेविषयी अतिशय उत्सुक आहे. पण त्याच बरोबर थोडासा टेन्शनमध्ये देखील आहे. पौराणिक पात्र साकारण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. ही भूमिका अतिशय आव्हानात्मक आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्याही मोठ्या आहेत. मी अशाच भूमिकेची वाट पाहात होतो आणि मला आशा आहे की या नव्या रूपात प्रेक्षकांना मी आवडेल.’’
कर्मफलदाता शनी या मालिकेतील पुढील काहीच भागात प्रेक्षकांना खूप नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता मालिकेत शनी सूर्यलोकात परत येणार आहे. आपण आधी पाहिले त्यापेक्षा अगदी वेगळया रूपात आपल्याला शनी दिसणार आहे. हा शनी पूर्णपणे अलिप्त आहे आणि त्याला त्याचे कोणतेही नाते किंवा पदवीची फिकीर नाही. त्याला कोणत्याही गोष्टीचे दुःख नाहीये किंवा परत आल्याचा त्याला आनंदही नाही. त्याच्या सगळ्यात जवळची असणारी त्याची आई आता त्याच्यावर नाखूष आहे, ती त्याला भद्राच्या मृत्युला जबाबदार धरते आहे. आता शनिच्या परत येण्यामुळे त्याचे त्याच्या आई सोबत असलेले प्रेमळ नाते सुधारेल की बिघडेल?
हे प्रेक्षकांना कर्मफलदाता शनी या मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

Also Read : जुही परमार आणि सचिन श्रॉफ घेणार घटस्फोट
Web Title: Shani's role is to play Rohit Khurana in the series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.