Shakti ... Fame Vivian Dysane realized thousands of rupees in Bangkok on perfumes | ​शक्ती... अस्तित्व के एहसास की फेम विवियन डिसेनाने बँकॉकमध्ये परफ्युमवर उधळले हजारो रुपये

शक्ती अस्तित्व के एहसास की ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील काही भागांचे चित्रीकरण नुकतेच बँकॉक, पट्टाया आणि थायलंडमधील अनेक निसर्गरम्य ठिकाणी झाले. रुबिना दिलाइक आणि विवियन डिसेना यांनी या मालिकेचे चित्रीकरण करत असताना खूप सारी धमाल मस्ती केली. त्यांच्यासाठी या चित्रीकरणाचा अनुभव खूप चांगला होता. ते दोन आठवडे तरी थालडंडमध्ये होते. त्यामुळे त्यांना तिथे फिरायला देखील वेळ मिळाला. त्यामुळे एक हॉलिडे एन्जॉय केला असल्याचे त्या दोघांनाही वाटत आहे. 
मालिकेचे चित्रीकरण नसल्यास रुबिना आणि विवियन बँकॉकमध्ये फिरायचे. तसेच त्यांनी तिथे खूप शॉपिंग देखील केले आहे. विवियन तर तिथल्या स्थानिक मार्केटमध्ये देखील गेला होता. तिथून त्याने अनेक प्रकारचे परफ्युम विकत घेतले. बाजारात फिरत असताना विवियन सहज एका परफ्युमच्या दुकानात गेला होता. त्याला त्या परफ्युमचा वास इतका आवडला की, त्याने पन्नास हजार रुपयांचे परफ्युम त्या दुकानातून विकत घेतले. 
शक्ती अस्तित्व के एहसास की या मालिकेच्या कथानकाला आता खूप चांगले वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारे सौम्या म्हणजेच रुबिना दिलाइक आणि हरमन म्हणजेच विवियन डिसेना थायलंडमध्ये गेले असल्याचे दाखवले जाणार आहे. सौम्या हरमनपासून दूर जाण्यासाठी बँकॉकमध्ये नोकरी करण्याचे ठरवणार आहे आणि नॅनी म्हणून तेथील एका घरात काम करणार आहे तर सौम्याला पुन्हा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी हरमनसुद्धा बँकॉकला जाणार आहे. सौम्याच्या जीवनातील आणखी एक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 vivian dsena
Web Title: Shakti ... Fame Vivian Dysane realized thousands of rupees in Bangkok on perfumes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.