‘शाका लाका बूम-बूम’ (२००२-०४) या टीव्ही शोमध्ये संजूची भूमिका साकारणारा किंशुक वैद्य सध्या त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण असे म्हटले जात आहे की, किंशुक टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानिया हीला डेट करीत आहे. दोघेही एकमेकांविषयी खूप पजेसिव्ह आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्टार्सनी त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी एका मुलाखतीत जाहीरपणे वाच्यता केली आहे. डीडी नॅशनल चॅनलवर प्रसिद्ध होणाºया ‘शाका लाका बूम-बूम’ या मालिकेने किंशुक याला खºया अर्थाने ओळख मिळवून दिली. पुढे हा शो स्टार प्लस चॅनेलवर प्रसारित केला जात होता. लहान मुलांमध्ये हा शो खूपच फेमस होता. शोमध्ये संजूची भूमिका साकारणारा किंशुक वैद्य त्यावेळी खूपच प्रसिद्धीझोतात आला होता. आता तो मोठा झाला असून, टीव्ही अभिनेत्री शिव्याला डेट करीत आहे. न्यूज वेबसाइट इंडिया फॉर्म्सने दिलेल्या एका मुलाखतीत शिव्या पठानियाने सांगितले की, किंशुकसोबत काम करणे खूप चांगले वाटते. मी किंशुकला सांगितले की, जेव्हा मी शाळेत जात होती, तेव्हा तुझा ‘शाका लाका बूम-बूम’ हा शो बघत होती. तेव्हापासून मी त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडली आहे. यावेळी शिव्याने हेदेखील सांगितले की, आमच्यात आॅनस्क्रिनबरोबरच आॅफस्क्रिनही चांगले रिलेशन आहेत. 
 

हे दोघे एका शोमध्ये आॅनस्क्रिन मॅरिड कपलची भूमिका साकारत आहेत. आर्यन दिवाकर सेठिया आणि सांची आर्यन सेठिया नावाचे रोल ते प्ले करीत आहेत. किंशुक आणि शिव्या नेहमीच फेस्टिव्हल सेलिब्रेशन, पार्टी आणि फॅमिली गेट टूगेदरमध्ये एकत्र बघावयास मिळतात. त्याचबरोबर हे दोघे नेहमीच त्यांचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरही शेअर करीत असतात. शिव्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रातही नशीब आजमावून बघितले. २०१३ मध्ये तिने मिस शिमलाचा ताजही जिंकला आहे. 
Web Title: 'Shaka Laka Boom-Boom' is the child actress 'Hot Actress' date!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.