‘ये रिश्ते है प्यार के’च्या सेटवर शाहीर शेखने केली मस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:15 AM2019-03-25T07:15:00+5:302019-03-25T07:15:00+5:30

‘ये रिश्ते है प्यार के’ या नव्या मालिकेत मानवी नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध या विषयांवरील एक नवा आणि पुरोगामी दृष्टिकोन सादर करण्यात आला आहे.

Shaheer Sheikh plays a prank on the set of Yeh Rishtey Hain Pyaar Ke | ‘ये रिश्ते है प्यार के’च्या सेटवर शाहीर शेखने केली मस्करी

‘ये रिश्ते है प्यार के’च्या सेटवर शाहीर शेखने केली मस्करी

googlenewsNext

स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या नव्या मालिकेत मानवी नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध या विषयांवरील एक नवा आणि पुरोगामी दृष्टिकोन सादर करण्यात आला आहे. मालिकेचा नायक शाहीर शेखने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने तर जिंकली आहेतच, शिवाय सेटवरही तो सर्वांचा लाडका कलाकार बनला आहे. 


सेटवरील वातावरणात खमंग आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी त्याने आपली नायिका रिया शर्माची मस्करी केली. निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या मालिकेतील होळीच्या प्रसंगांचं चित्रीकरण होत होते, तेव्हा शाहीरला सेटवरच होळी खेळायची घाई झाली होती. त्या दिवशी शाहीर आणि रिया यांच्या प्रसंगांचे चित्रीकरण सकाळी लवकर ठेवण्यात आले होते; पण आपली तब्येत बरी नसल्याने आपण सेटवर उशिरा येऊ, असा निरोप शाहीरने पाठविला. चित्रीकरणाला विलंब होणार असल्याचे लक्षात येताच रियासह साऱ्या युनिटचे धाबे दणाणले. पण तेवढ्यात शाहीर सेटवर उपस्थित झाला आणि येताना त्याने भरपूर रंग आणि मिठाई बरोबर आणली होती. तेव्हा शाहीरने आपल्या सर्वांची मस्करी केल्याचं कलाकार आणि कर्मचाऱ्याच्या लक्षात आले.”


मालिकेच्या प्रदीर्घ चित्रीकरणाच्या वेळापत्रकामुळे कलाकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह कायम टिकविण्यासाठी शाहीर हा अशी अधूनमधून थट्टा-मस्करी करीत असतो. बरेचदा त्याच्या थट्टेची बळी ही मालिकेत मिष्टीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया शर्माच ठरते, पण तिला त्याचा हा स्वभाव आवडतो. मालिकेतील मिष्टी आणि अबीरच्या उमलत्या नात्याप्रमाणेच सेटवरही हे दोघे बरेचदा एकत्र गप्पा मारताना दिसतात.

Web Title: Shaheer Sheikh plays a prank on the set of Yeh Rishtey Hain Pyaar Ke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.