Shah Rukh Khan's heroine is to be made - Megha Chakraborty | शाहरूख खानची नायिका बनायचं आहे- मेघा चक्रबोर्ती

‘कृष्णा चली लंडन’ या नव्या मालिकेत कृष्णाची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिने नुकतेच बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान याच्याबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम उघड केले. इतकेच नव्हे, तर एक दिवस आपल्याला त्याची नायिका म्हणून चित्रपटात भूमिका साकारावयाची आहे, असे आपले स्वप्न असल्याचेही तिने सांगून टाकले! मेघा म्हणाली, “मी लहानपणापासूनच शाहरूखची प्रचंड मोठी चाहती आहे. मी त्याचा प्रत्येक चित्रपट पाहिला असून त्याचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. मला एक दिवस त्याच्या चित्रपटात त्याची नायिका बनायचं आहे.त्याच्या बहुतांशी नायिका जशा सुळसुळीत साड्या नेसतात, तशी साडी नेसायची आहे आणि त्याच्याबरोबर एका रोमँटिक गाण्यावर नृत्यही करायचं आहे. मला त्याचं व्यक्तिमत्त्वही आवडतं आणि तो आपल्या सहनायिकांना ज्या आदराने वागवितो, तेसुध्दा मला खूप आवडतं. तो एक प्रतिभावान अभिनेता असून तो कोणतीही भूमिका अगदी सहज आणि उत्कृष्टपणे साकार करू शकतो!”

‘कृष्णा चली लंडन’ ही कानपूरमधील 21 वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे.त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते- ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो. कृष्णा मात्र महत्त्वाकांक्षी असते आणि तिला सारे जग पाहायचे असते.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचा जोडीचे अनेक फॅन्स आहेत. हल्लीच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती ऊर्फ स्टारप्लसवरील कृष्णा चली लंडनमधील कृष्णाने या जोडप्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “मला अनुष्का आणि विराट हे अतिशय आवडतात कारण ते एक पॉवर कपल आहेत. मी त्यांच्या नेहमीच प्रेम पाहिले आहे. अनुष्का विराटच्या प्रत्येक सामन्याच्या वेळेस त्याला अगदी उत्साहाने चीअर करत असते आणि तोसुद्धा मैदानातून तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत असतो. ते दोघे नेहमीच एकमेकांना समर्थन देतात आणि त्यामुळे त्यांना दोघांना ऑनस्क्रीन एकत्र पाहताना मला खूप छान वाटतं.” कृष्णा चली लंडनमध्ये मेघा एका महत्त्वाकांक्षी आणि खंबीर मनाच्या मुलीची भूमिका साकारत असून तिला डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि आपल्या खूप प्रेम करणारा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला साथ देणारा विराट कोहलीसारखा पती आपल्याला मिळावा असे तिला वाटते… आणि मग तिचे लग्न होते राधेसोबत, जो एक गोड दिसणारा मुलगा असून तो जणू अख्खे जग तिच्या पायाशी आणून ठेवतो आणि तो अगदी क्रिकेटपटू विराट सारखा आहे.
Web Title: Shah Rukh Khan's heroine is to be made - Megha Chakraborty
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.