Shah Rukh Khan and he came back after 10 years together | शाहरूख खान आणि ती तब्बल 10 वर्षांनी पुन्हा आले एकत्र

किंग खान शाहरुखसह एकदा तरी काम करण्याची प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. त्यामुळे जब हॅरी मेट सेजल सिनेमाच्या निमित्ताने का होईना छोट्या पडद्याच्या कलाकारांना शाहरुखसह काम करण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली आहे.अशीच इच्छा पारुल चौहानचीही पूर्ण झाली आहे.ती ही एक नाही तर दुस-यांदा शाहरुसह काम कऱण्याची इच्छा पूर्ण झाली आहे.‘जब हॅरी मेट सेजल’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी ‘स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या एका विशेष भागात शाहरूख खान व नायिका अनुष्का शर्मा हे सहभागी झाले होते.यावेळी या मालिकेत स्वर्ण गोएंका ही व्यक्तिरेखा साकारणा-या पारुल चौहान या अभिनेत्रीला शाहरूख खानबरोबर तब्बल 10 वर्षांनी एकत्र चित्रीकरण करण्याची संधी मिळाली.10 वर्षांपूर्वी पारुलची पहिली मालिका असलेल्या ‘बिदाई’या मालिकेत शाहरूख खान आपल्या ‘क्या आप पाँचवी पास से तेझ है?’ या मालिकेच्या प्रसिध्दीसाठी आला होता आणि पारुलने त्याच्याबरोबर एकत्र चित्रीकरण केले होते. त्यानंतर शाहरूख खान आता तिच्या ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’या मालिकेत आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता.आपल्या या आवडत्या अभिनेत्याबरोबर 10 वर्षांनी पुन्हा भेट झाल्याच्या घटनेविषयी पारुल म्हणाली, “मी माझ्या टीव्ही मालिकांतील अभिनयाच्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता, तेव्हा एसआरके माझ्यासोबत होता. आता 10 वर्षांनंतर मी या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करीत असतानाच्या टप्प्यावरही तो माझ्यासोबत आहे. आपल्या कामासाठी तो घेत असलेल्या कठोर परिश्रमांचं मला कौतुक वाटतं. मी त्याचे सारे चित्रपट पाहिलेले आहेत. आता इतक्या वर्षांनी त्याच्याबरोबर चित्रीकरण करण्यापूर्वी मी मनातून काहीशी धास्तावले होते; परंतु शाहरूखचा करिष्मा असा आहे की तो सा-याच गोष्टी किती सोप्या करून टाकतो! तो खरंच लाखांत एक आहे!”

Web Title: Shah Rukh Khan and he came back after 10 years together
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.