On the sets of Poros, Mohit Abarol and Vaishali call it Lalawani by the name | ​पोरसच्या सेटवर सगळे मोहित अबरोल आणि लक्ष लालवाणीला या नावाने मारतात हाक

पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत लक्ष लालवाणी, सुहानी धानकी, रती पांडे, आदित्य रेडजी, प्रणित भट्ट यांसारखे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोरस या मालिकेत पोरसची व्यक्तिरेखा लक्ष लालवाणी तर हस्तीची व्यक्तिरेखा मोहित अबरोल साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान लक्ष आणि हस्तीमध्ये खूपच चांगलीच गट्टी जमली आहे. ते दोघे मालिकेच्या सेटवर मजा-मस्ती करतात. हे दोघे काहीच दिवसांत एकमेकांचे खूपच चांगले मित्र बनले आहेत. त्यामुळे सेटवर सगळे त्यांना जय-वीरू या नावानेच सगळे हाक मारतात. आता तर त्यांच्यातील नाते इतके दृढ आहे की, ते एकमेकांचे सख्खे भाऊच असल्यासारखे त्यांना वाटायला लागले आहे. याविषयी मोहित अबरोल सांगतो, “मालिकेच्या पहिल्या दिवसापासून मी आणि लक्ष एकमेकांचे चांगले मित्र बनलो आहोत. सेटवर आम्ही सख्खे भाऊ असल्यासारखेच वागतो.” चित्रीकरणातील एका प्रसंगाचा उल्लेख करून देताना मोहित सांगतो, “थायलंडमध्ये आमचे चित्रीकरण सुरू होते, त्यावेळी काही अॅक्शन दृश्ये चित्रित करायची असताना असे व्हायचे की, आम्हा दोघांना देखील इजा होत होती. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या मेकअपमॅनला आमच्या जखमांवर ड्रेसिंग करायला सांगायचो. आम्हाला एकमेकांची वेदना सहनच होत नसे. आमच्यात बंधुत्वाची भावना कधी निर्माण झाली हे आम्हालाच कळले नाही. आम्ही आता एकमेकांची काळजी देखील घेऊ लागलो आहोत.”
पोरसच्या आगामी भागांत पुरू सुमेर (ऋषी वर्मा) कडे पोहोचणार असून शिवदत्त (अमन धालीवाल) सुमेरच्या बदल्यात अनुसूयेला (रती पांडे) मागून घेणार आहे. दुसरीकडे, हस्ती (मोहित अबरोल) अनुसूया आणि पोरसचे सत्य डेरियसकडे उघड करणार आहे.

Also Read : ​पोरस मधील समीक्षा सहकलाकारांसाठी बनली कूक
Web Title: On the sets of Poros, Mohit Abarol and Vaishali call it Lalawani by the name
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.