On the set of 'My Sai', Toral Rasputra is killed by the name | ​‘मेरे साई’ या मालिकेच्या सेटवर तोरल रासपुत्रला या नावाने मारली जाते हाक

कोणत्याही अभिनेत्यासाठी मग तो टेलिव्हिजनवरील असो किंवा चित्रपटातील, त्याचे खरे यश हे लोक त्याला त्याच्या प्रत्यक्ष नावापेक्षा त्याने पडद्यावर साकारलेल्या व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखू लागतात यातच असते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई या मालिकेत बायजाबाईची भूमिका साकारणार्‍या तोरल रासपुत्रला आपली भूमिका खूप आवडते आहे आणि प्रेक्षक देखील तिच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सेटवर कलाकारांना कधी त्यांच्या खऱ्या नावाने तर कधी व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखले जाते. तोरलच्या व्यक्तिरेखेमुळे या मालिकेच्या सेटवर तिला नेहमीच माँ म्हणून संबोधले जाते. फक्त तिचे सह-कलाकारच नाही; तर प्रॉडक्शन क्रू मधील सगळेच तिला माँ हीच हाक मारतात. याबाबत तोरल रासपुत्र सांगते, “सेटवर सर्वजण मला माँ म्हणतात. बायजाची व्यक्तिरेखा साईला जपणारी एका ममताळू आईची आहे आणि साई नेहमी तिच्याकडे आईच्या नात्याने बघतात. माझ्या या भूमिकेमुळे सेटवरील लोकांना मला माँ म्हणून संबोधण्याची सवय लागली आहे. मातृ दिनाच्या दिवशी तर सेटवरील प्रत्येकाने मला आवर्जून मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. सेटवर इतके सारे लोक मला माँ म्हणत असल्याने मला जगत जननी असल्यासारखेच वाटायला लागले आहे. मेरे साई ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेतील सगळे कलाकार एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अबीर सुफी, वैभव मांगले आणि मेरे साईच्या सगळ्याच कलाकारांसोबत चित्रीकरण करणे हा खूपच चांगला अनुभव आहे.”
मेरे साईच्या आगामी कथानकात, दिलावरसोबत शिर्डी सोडून गेलेले साई पुन्हा द्वारकामाईत परतणार आहेत. त्यामुळे सर्व गावकरी खुश होणार आहेत. दिलावर आणि देवीदास यांच्यात आध्यात्मिक वाद होतो, ज्यात देवीदास जिंकतात. दिलावर अलीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात साईंना यश येईल का? याचे उत्तर प्रेक्षकांना मेरे साईच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहे. 
मेरे साई ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साई बाबांच्या आयुष्यातील अनेक घटना पाहायला मिळत आहेत. 

Also Read : मेरे साई या मालिकेतील अबीर सुफीची नवी मैत्रीण तुम्ही पाहिली का?
Web Title: On the set of 'My Sai', Toral Rasputra is killed by the name
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.