The set of Eklavya set by Ram Lailafeam Vaishak Khan | ​‘रामलीला’फेम वासिक खान उभारणार एक्कावनचा सेट

स्टार प्लसवरील एक्कावन ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील नायिका ही इतर मालिकांमधील नायिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तिच्या घरातील वडिलधाऱ्या पुरुषांनी तिला लहानाचे मोठे केले असल्याने तिचे वागणे देखील एखाद्या मुलाप्रमाणेच आहे. आता या मालिकेत लवकरच या नायिकेचे लग्न झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. मालिकेत सुशील आणि सत्याशीचे लवकरच लग्न होणार आहे. प्रेक्षक या बहुचर्चित विवाहाची गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहात आहेत. हा विवाह कच्छमध्ये होणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कच्छमध्ये लग्न करण्यास सुशील म्हणजेच प्राची तेहलान आणि सत्या म्हणजेच नमिष तनेजा अतिशय उत्सुक आहेत.
आता एक्कावन या मालिकेच्या सेटचे कलादिग्दर्शन वासिक खान करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला : रामलीला या चित्रपटात गुजरात आणि कच्छच्या संस्कृतीचे अचूक दर्शन घडविणारे सेट उभारल्यामुळे वासिक खान प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता या मालिकेचे कथानकही गुजरातमध्येच घडत असल्याने आपल्या तज्ज्ञ अनुभवाचा उपयोग करून वासिक खान पुन्हा एकदा गुजरातचा माहोल या मालिकेसाठी उभा करणार असल्याची चर्चा आहे.
गोलियों की रासलीला : रामलीला या चित्रपटाचा सेट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे या मालिकेच्या सेटचे काम बघूनच त्याला एक्कावन मालिकेत गुजराती संस्कृतीचे दर्शन घडविणारे सेट उभारण्याचे काम देण्यात आले आहेत. रामलीला या चित्रपटाची कथा आणि एक्कावन या मालिकेची कथा कच्छमध्येच घडत असल्याने वासिक खानशिवाय दुसऱ्या कोणत्या कलादिग्दर्शकाचा मालिकेच्या टीमने विचारही केला नाही. एक्कावन मालिकेतील या विवाह सोहळ्याचे चित्रीकरण कच्छच्या रणात करण्यात येणार आहे. या मालिकेतील कुटुंब हे गुजराती असल्याचे दाखवल्यामुळे हे लग्न कच्छमध्ये झाल्याचे दाखवण्यात येणार असून अनेक गुजराती परंपरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कच्छच्या रणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याचा मालिकेशी असलेला संबंध लक्षात घेता या लग्नाचे चित्रीकरण तिथे करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 

Also Read : ​उंचीमुळे या अभिनेत्रीच्या लग्नात येतोय अडथळा
Web Title: The set of Eklavya set by Ram Lailafeam Vaishak Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.