This series will be seen by child artist Vijay Rawal | बालकलाकार विजय रावल दिसणार ह्या मालिकेत
बालकलाकार विजय रावल दिसणार ह्या मालिकेत

ठळक मुद्दे विजय रावल दिसणार साहदेवच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील बालकलाकार विजय रावल याने 'पेशवा बाजीराव', 'क्राईम पेट्रोल' यांसारख्या मालिकेत काम करून रसिकांच्या मनात घर केले आहे. आता तो सोनी टेलिव्हिजनवरील 'मेरे साई' या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो साहदेवच्या भूमिकेत दिसणार आहे.

या मालिकेबद्दल विजय रावलने सांगितले की, मी 'मेरे साई' मालिकेत साहदेवची भूमिका साकारतो आहे. हा असा मुलगा आहे ज्याला वस्तू चोरण्याची आणि ते विसरून जाण्याची सवय असते. त्याचे आई वडील त्याच्या या सवयीमुळे हैराण व नाराज असतात. ते त्यांच्या समाधानासाठी साईं बाबांना भेटण्याचा निर्णय घेतात. साई सहदेवला भेटतात व त्याच्याशी बोलतात. त्यानंतर सहदेव साईंचा भक्त बनतो. 

'मेरे साई' मालिकेत साई बाबांची भूमिका अभिनेता अबीर सूफीने निभावली आहे. अबीर सूफी या गुणी कलाकाराला 'मेरे साई' या मालिकेमुळे आपल्यातील एक छुपी कला सादर करण्याची संधी मिळाली. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला गायक आहे. मेरे साई मालिकेत मुलांवर खूप प्रेम करणारे साई बाबा गाणे गाऊन मुलांचे मन खूश करण्याचे ठरवतात. त्यामुळे याच भागात अबीरने हरे राम हरे कृष्ण हे भजन गाऊन आपले गायन कौशल्य दाखवले होते. सेटवर उपस्थित दिग्दर्शकापासून ते समस्त क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनाच अबीरचा मधुर आवाज ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी अबीरला पुन्हा गाणे म्हणण्याचा आग्रह केला होता. 


Web Title: This series will be seen by child artist Vijay Rawal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.