‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:15 AM2018-12-16T07:15:00+5:302018-12-16T07:15:00+5:30

'नजर' या मालिकेतील धाडसी आणि आक्रमक नायिका धोकादायक आणि थरारक स्टंट प्रसंग साकारताना स्वत: मागे हटत नाहीत आणि त्यांचे असे हे स्टंट पाहून प्रेक्षक मनातून स्तंभित होतात.

Seeing the stunts of 'Nazar' | ‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क

‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क

googlenewsNext

स्टार प्लसवरील 'नजर' या मालिकेतील धाडसी आणि आक्रमक नायिका धोकादायक आणि थरारक स्टंट प्रसंग साकारताना स्वत: मागे हटत नाहीत आणि त्यांचे असे हे स्टंट पाहून प्रेक्षक मनातून स्तंभित होतात. मालिकेतील मोहना, पिया, रूबी आणि पियाची आई दिव्या यांनी आतापर्यंत वेळोवेळी असे थरारक स्टंट प्रसंग साकारून स्टंट प्रसंग ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे, ही गोष्ट खोटी ठरवली आहे. महिलाही असे स्टंट प्रसंग सहजतेने साकारू शकतात, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.


यासंदर्भात मालिकेत मोहोनाची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मोनालिसा म्हणाली, ''मला तर मालिकेतील अ‍ॅक्शन प्रसंग साकारतानाच खरी मजा येते. या मालिकेतील स्टंट हे उच्च प्रतीचे थरारक असून ते साकारण्यासाठी आम्ही नेहमी प्रशिक्षण घेऊन सराव करतो. हे स्टंट प्रसंग साकारणे हे नक्कीच आव्हानात्मक असले, तरी मला ते साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजते. कारण महिला कलाकारांना असे प्रसंग साकारण्याची फारशी संधी कुठे मिळते?'' 
पियाची भूमिका रंगविणारी नियती फटनाणी म्हणते, ''मला हे स्टंट प्रसंग रंगविताना फार मजा येते आणि या मालिकेत मला असे प्रसंग स्वत:च साकारण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद वाटतो. हे अ‍ॅक्शन प्रसंग साकारणे तसे गुंतागुंतीचे असले, तरी मालिकेचे ते एक प्रमुख आकर्षण आहे. काही स्टंटप्रसंगात आम्हाला दोरीला तासन् तास लटकून राहावे लागते. अ‍ॅक्शन प्रसंगांत उड्या मारणे, कोलांट्या उड्या मारणे आणि जमिनीवर लोळण घेणे यासाठी मला स्वत:ला तंदुरुस्त राहावे लागते. हे प्रसंग साकारणे उत्तेजित करणारे असले, तरी दरवेळी त्यांच्या जोखमीत आणि थरारकतेत वाढच होत चालली आहे.''
 

Web Title: Seeing the stunts of 'Nazar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.