Seeing the love of Bhau Kadam, his brother Rocks! | भाऊ कदमचं त्याच्या लेकींवरील प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल भाऊ रॉक्स !

‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम म्हणजे रसिकांचा लाडका भाऊ कदम. चला हवा येऊ द्या या शोमध्ये भाऊ कधी शांताबाई बनतो तर कधी पप्पा बनतो, त्याचं प्रत्येक रुप रसिकांना चांगलंच भावतं.कॉमेडीचं भन्नाट टायमिंग, अभिनय कौशल्य यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे रसिकांना खळखळून हसवण्यास भाऊ भाग पाडतो. भाऊ कदमनं साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही रसिकांच्या मनावर गारुड घालून आहेत. आपला लाडका विनोदवीर भाऊ कदमचं रिअल लाइफ कसं आहे जाणून घ्यायची इच्छा रसिकांना असणारच. भाऊ कदम हा डोंबिवलीकर आहे हे सा-यांनाच माहिती आहे. आपण डोंबिवलीकर असल्याचा उल्लेख त्याने वारंवार आपल्या स्कीटमध्येही केला आहे. इतकी प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदमनं आपलं डोंबिवलीतील जुनं घर सोडलेलं नाही. शूटिंगसाठी भाऊ दररोज डोंबिवली ते मुंबई असा प्रवास करतो.शूटिंगच्या इतक्या बिझी शेड्युलमुळे भाऊला आपल्या कुटुंबाला पूर्वीप्रमाणे फारसा वेळ द्यायला मिळत नाही. मात्र शूटिंगमधून वेळ मिळाला की भाऊ पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देतो. भाऊ कदमच्या अशाच निवांत क्षणांदरम्यानचे फोटो समोर आले आहेत. या फोटोत भाऊ कदम आपल्या कुटुंबासह खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.
Also Read:पाहाः कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे यांची घरी होते अशी अवस्था,पाहून तुम्हीही म्हणाल चला हवा येऊ द्या!एका फोटोमध्ये भाऊ कदमसह त्याची पत्नी ममता कदम पाहायला मिळत आहे. 1991 साली भाऊ कदमनं अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. भाऊच्या करियरमधील प्रत्येक चढउतारा दरम्यान त्याची पत्नी ममता कदम त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी ठाकली. भाऊ आणि ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. दुस-या फोटोत भाऊ आपल्या लेकींसह आनंदात असल्याचं दिसतंय. शुटिंग नसताना निवांत क्षण भाऊ आपल्या लेकींसह एन्जॉय करत असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदममधील साधेपणा आजही कायम आहे. आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळेच साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम आज रसिकांचा लाडका बनला आहे. त्यामुळे रसिकही मोठ्या अभिमानाने म्हणतात भाऊ कदम रॉक्स !    
Web Title: Seeing the love of Bhau Kadam, his brother Rocks!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.