सिनेमा असो किंवा टीव्ही मालिकांमध्ये झळकणारे कलाकारांचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेता आणि अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.आपल्या आवडत्या कलाकारांविषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात.मग ते त्याचं अफेअर असो, लग्नाच्या चर्चा किंवा मग लाईफस्टाईल प्रत्येक विषयात फॅन्सना रस असतो.अशा अनेक रसिकोत्सुक गोष्टींपैकी एक बाब म्हणजे टीव्ही अभिनेत्री जिया मानेकचे घर.आपलं स्वप्नातलं घरा खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात.त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकार यांच्या आलिशान घराचे बाहेरील आणि आतील छायाचित्रे अनेकदा समोर आली आहेत.मात्र आता टीव्ही जगतातील अनेक टीव्ही कलाकारांच्या घराचे आतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.जिया मुंबईमधील मलाड येथील एका अपार्टमेंटमध्ये 16 व्या मजल्यावर राहते. ती 2 BHK फ्लॅटमध्ये राहते.तिने 2013 मध्ये ड्रिम हाउस खरेदी केले होते.दोन बेडरुम  लिविंग एरिया,किचन असून या घराचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.जिया 'साथ निभाना साथिया' मध्ये गोपी बहूची भूमिकेने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती.याच भूमिकेमुने तिला पैसा,प्रसिद्धी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमही बनवले. जियाने तिच्या घराचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोजमध्ये ती घरात निवांत क्षण घालवताना पाहायला मिळत आहे.आता सोशल मीडियावर शाहरूख,सलमान यांच्या घरांप्रमाणे जिया मानेकच्याही घराला चाहते खूप पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्याचबरोबर ती पुन्हा कधी छोट्या पडद्यावर झळकणार असेही प्रश्न तिला तिचे चाहते विचारताना दिसत आहेत.
Web Title: SEE PICS: Gopi Bahu, Jia Manek's Mumbai's elite ashana!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.