SEE PHOTO: The cricketer became a Marathi Maratha | SEE PHOTO: श्रृती मराठे बनली क्रिकेटर

कलाकार मंडळी त्यांच्या सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये कायम व्यस्त असतात.बिझी शेड्युलमुळे त्यांचा बराच काळ हा सिनेमा किंवा मालिकेच्या सेटवरच जातो.सिनेमा आणि मालिकेतील कलाकारच त्यांच्यासाठी जणू काही कुटुंब बनते. त्यामुळे सेटवरच कलाकार मंडळी सण, वाढदिवस अशा विविध गोष्टींचे सेलिब्रेशन करतात. सेटवर काम करताना अपवादानेच या कलाकारांना वेळ मिळतो. एखादा सीन करताना वेळ मिळाला तर सेटवरच ही सेलिब्रिटी मंडळी या ना त्या पद्धतीने टाइमपास करतात. कधी सेलिब्रिटी एखादा खेळ करतात तर कधी सेटवरच गप्पांचा फड रंगतो. क्रिकेट हा तमाम भारतीयांचा आवडता खेळ. वेळ मिळेल तिथे जागा बनवून भारतीय क्रिकेट खेळण्यासाठी मार्ग शोधून काढतात.

(Also Read:श्रृती मराठेचा बालपणीचा हा निरागस अंदाज तुम्ही पाहिलाय का?)
टाइमपास करण्यासाठी सेलिब्रिटी कधी कधी सेटवरच क्रिकेट खेळू लागतात. नुकतंच असंच काहीसं चित्र जागो मोहन प्यारे मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाले. काहीसे निवांत क्षण मिळाल्याने 'जागो मोहन प्यारे' मालिकेच्या सेटवरच क्रिकेटचा खेळ रंगला. यावेळी अभिनेत्री श्रृती मराठे ही सुद्धा क्रिकेटच्या रंगात पूर्णपणे रंगून गेल्याचं पाहायला मिळालं. क्रिकेट खेळताना श्रृतीचा ग्लॅमरस अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. श्रृतीने सोशल मीडियावरुन हे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर केले.'जागो मोहन प्यारे' या मालिकेत भानु बनून आपल्या मालकाच्या म्हणजेच मोहनच्या सगळ्या अडचणी चुटकीसरशी दूर करणारी श्रृती क्रिकेट खेळताना दंग झाली होती. मालिकेत लाल रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसणारी श्रृती त्याच ड्रेसमध्ये क्रिकेट खेळत होती. बॅटिंग असो किंवा फिल्डिंग सारं काही व्यस्थित लक्ष केंद्रित करुन श्रृती क्रिकेटचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले. विकेट घेतल्यानंतर तितक्याच दणक्यात आणि उत्साहात सेलिब्रेशन करताना श्रृती  पाहायला मिळत आहे. यावेळी जागो मोहन प्यारे मालिकेतील भानुचे मालक म्हणजेच अतुल परचुरे यांनीही क्रिकेटचा आनंद लुटला. मात्र सगळ्यांमध्ये श्रृती मराठेचा ग्लॅमरस क्रिकेटरचा अवतार तुम्हाला नक्कीच क्लीन बोल्ड करेल यांत शंका नाही. 

Web Title: SEE PHOTO: The cricketer became a Marathi Maratha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.