The secret behind being the part of the cast classic 'Jai Jeeta Wahi Sikandar' which was opened with dignity | शानने उघडले कल्‍ट क्‍लासिक 'जो जीता वही सिकंदर'चा भाग असण्‍यामागील गुपित

छोट्या पडद्यावरील  'द वॉईस इंडिया किड्स सीजन २' फिनालेच्‍या दिशेने वाटचाल करत आहे आणि प्रेक्षकांचा उत्‍साह शिगेला पोहोचला आहे. ही गायन स्‍पर्धा दर आठवड्याला अधिक आव्‍हानात्‍मक बनत आहे. शोच्‍या आगामी भागामध्‍ये स्‍पर्धक ९०च्‍या दशकातील सदाबहार गाणी गाताना दिसणार आहेत. ही सदाबहार गाणी अत्‍यंत लोकप्रिय होती आणि स्‍पर्धक या गाण्‍यांमधून नॉस्‍टॅल्जिक वातावरणाची निर्मिती करणार आहेत. असाच एक परफॉर्मन्‍स सादर केलेल्‍या तरुण शेकिनाहने शानला त्‍याच्‍या सुरुवातीच्‍या संघर्षमय क्षणांची आठवण करून दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेकिनाहने ९०च्‍या दशहकातील कल्‍ट मूव्‍ही 'जो जीता वही सिकंदर'मधील 'पेहला नशा' गाण्‍यासह सर्वांना मंत्रमुग्‍ध केले आणि तिचा हा परफॉर्मन्‍स पाहून परीक्षक दंगच झाले. तिच्‍या परफॉर्मन्‍सची प्रशंसा करत असताना शानने या चित्रपटाशी संबंधित त्‍याच्‍या जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. या चित्रपटामधूनच त्‍याच्‍या करिअरला सुरुवात झाली होती. या गायकाने सांगितले की त्‍याने या चित्रपटामध्‍ये लहानशी भूमिका देखील साकारली आहे.चित्रपटामधील शाळेच्‍या ग्रुप्‍सपैकी एका ग्रुपमध्‍ये तो असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍याला ते क्षण नेहमीच आठवतात. 

शान म्‍हणाला,''जो जीता वही सिकंदर या चित्रपटामधील 'पेहला नशा' या गाण्‍याव्‍यतिरिक्‍त सर्व गाण्‍यांना कोरस आहे. या कोरसमधील एक आवाज माझा आहे,कारण त्‍यांना नवीन आवाजांची गरज होती. मी या चित्रपटात अभिनय देखील केला आहे. आम्‍हाला दिवसाला १५० रुपये मिळायचे आणि मला ४ दिवसांचे ६०० रुपये मिळाले. मला 'जो जीता वही सिकंदर' चित्रपटामधून खूपकाही मिळाले.'' तो पुढे म्‍हणाला, ''मी 'मेरे यारो' या ओळीही गायल्या आहेत आणि मला त्‍यासाठी ४ तास वाट पाहायला लागली होती. इंडस्‍ट्रीमध्‍ये नवीन असल्‍याने मला कशाप्रकारे सर्व कामे होतात ते माहीत नव्‍हते. म्‍हणून मी माझ्या टीमला एका सिंगल लाइनसाठी किती वेळ लागेल असे विचारले आणि ते सर्व अचंबितच होऊन म्‍हणाले 'कोण आहे हा मुलगा? काल उदितजी ७ तास वाट पाहत होते आणि हा तक्रार करतोय'.शेकिनाहच्‍या परफॉर्मन्‍समधून मला त्‍या दिवसांची आठवण आलीचे त्याने यावेळी सांगितले.'' 
Web Title: The secret behind being the part of the cast classic 'Jai Jeeta Wahi Sikandar' which was opened with dignity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.