In the second stage of Saujal, | ​चाहुलच्या दुसऱ्या पर्वात दिसणार केतकी पालव

चाहुल या मालिकेचे पहिले पर्व लवकरच संपणार असून त्यानंतर प्रेक्षकांना या मालिकेचे दुसरे पर्व पाहायला मिळणार आहे. या दुसऱ्या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवे कलाकार दिसणार आहेत.
चाहुल या मालिकेच्या पहिल्या पर्वाच्या शेवटी प्रेक्षकांना शांभवी आणि सर्जा यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. पहिले पर्व संपल्यानंतर प्रेक्षकांना लगेचच दुसरे पर्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेचे फॅन्स नक्कीच खूश होणार आहेत. या दुसऱ्या पर्वात केतकी पालवची एंट्री होणार असून केतकी या मालिकेत निशा ही भूमिका साकारणार आहे. आता या निशाचा सर्जा आणि शांभवीसोबत काय संबंध आहे. तसेच तिच्या एंट्रीनंतर या दोघांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत हे प्रेक्षकांना दुसऱ्या पर्वात पाहायला मिळणार आहे. 
सर्जाला वाड्यामधील भुताने झपाटले असल्याचे आपल्याला काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. त्यानंतर सर्जाच्या वडिलांचा म्हणजेच यशवंतचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनांनी वाड्यामध्ये एकप्रकारची शांतता पसरली होती. या वाड्यात निर्मलाचे भूत फिरत असल्याचे आपल्याला पहिल्यापासूनच माहीत आहे आणि या भूताला मात देण्यासाठी शांभवीने हर एक प्रयत्न केलेले आहेत. भोसले वाड्यात भूत असल्याने हा वाडाय सोडून जाण्यास तिने सगळ्यांना तयार केले होते. तिचे ऐकून सगळेजण हा वाडा सोडून दुसऱ्या वाड्यात देखील राहायला गेले होते. पण त्या वाड्यावरदेखील निर्मला पोहोचली होती. ती सर्जाच्या प्रेमाखातर तिथे आली होती. पण आता मालिकेच्या शेवटी निर्मला शांभवी आणि सर्जा यांच्या आय़ुष्यातून जाणार असून ते त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात करणार आहेत. 
Web Title: In the second stage of Saujal,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.