सविता प्रभुणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेटवर झाली जंगी पार्टी, कलाकारांनी दिले खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 08:30 PM2019-04-22T20:30:00+5:302019-04-22T20:30:00+5:30

‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त्त होतं ते अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाचं.

Savita Prabhune's Birthday, Special Surprises by Artists On the Set Of Saath De Tu Mala | सविता प्रभुणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेटवर झाली जंगी पार्टी, कलाकारांनी दिले खास सरप्राईज

सविता प्रभुणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेटवर झाली जंगी पार्टी, कलाकारांनी दिले खास सरप्राईज

googlenewsNext

दिवस रात्र कलाकार मालिकेचे शूटिंग करत असतात. त्यामुळे मालिकांचे सेटच त्यांचे दुसरे घर बनते. कुटुंबापेक्षा जास्त वेळ कलाकार एकमेकांसोबत वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्यात घट्ट नाते निर्माण होते. सण असो किंवा वाढदिवस सगळ्या गोष्टीचे सेलिब्रेशन कालाकार सेटवर करताना पाहायला मिळतात.  

 

 

‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त्त होतं ते अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाचं. मालिकेतल्या सहकलाकारांनी आणि सेटवरच्या मंडळींनी केक कापून सविता यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला. ‘साथ दे तू मला’च्या टीमकडून मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून सविताही भारावून गेल्या होत्या.

 

‘साथ दे तू मला’ या मालिकेत आशुतोष कुलकर्णी सविता यांच्या मुलाची म्हणजेच समीर ही व्यक्तिरेखा साकारतोय. पडद्यावरची ही आई खऱ्या आयुष्यातही आम्हाला आईप्रमाणेच आहे अशी भावना आशुतोषने व्यक्त केली. सविता प्रभुणे आम्हा सर्व कलाकारांवर भरभरुन प्रेम करतात. त्यांचा सल्ला आमच्या नेहमी कामी येतो. त्यांच्या एनर्जीचं आम्हा सर्वांनाच विशेष कौतुक वाटतं. शूटिंग लांबलं तरी त्यांच्या उत्साहामध्ये तसुभरही कमतरता नसते. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच इच्छा मी व्यक्त करतो अशा शब्दांत आशुतोषने सविता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


या शुभेच्छा देऊन जे माझ्यावरील प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे. या शुभेच्छांमुळे भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ मिळेल” अशा शब्दांत  सविता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 

Web Title: Savita Prabhune's Birthday, Special Surprises by Artists On the Set Of Saath De Tu Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.