Savita Prabhune will appear in this 'new series' | सविता प्रभुणे दिसणार 'या' नव्या मालिकेत

सविता प्रभुणे लवकरच आपल्याला 'इंतकाम एक मासूम का' या मालिकेत दिसणार आहेत. एक सूडकथा असलेल्या या मालिकेत अविनाश सचदेव, मानव गोएल, रिकी पटेल यासारख्या अनेक कलाकार आहेत. या मालिकेत सविता या अविनाश सचदेवाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या भूमिकेबाबत त्या सांगतात, या मालिकेच्या माध्यमातून तीन वर्षांनंतर हिंदी मालिकेत पुनरागमन करतेय. गेल्या 3 वर्षांपासून मी मराठी मालिकांमध्ये व्यग्र राहिल्याने हिंदी मालिकांपासून दूर राहिले होते. पण आता पुन्हा एकदा मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे. या मालिकेची संकल्पना अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून तशी मी आजवर कधीच टीव्ही मालिकांमध्ये दिसून आली नव्हती. प्रेक्षकांना माझी भूमिका पसंत पडेल आणि ते माझ्यावर पूर्वीच्या मालिकांइतकचे यापुढेही प्रेम करीत राहतील, अशी  मला आशा आहे.   
पवित्र रिश्ता या मालिकेत अंकिता लोखंडे हिच्या प्रेमळ आईची भूमिका सविता प्रभुणे यांनी साकारली होती. यानंतर बराच काळ त्या हिंदी मालिकांपासून दूर होत्या. सध्या त्या खुलता कळी खुलेन या मालिकेत विक्रांतच्या आईची भूमिका साकारत आहे. सविता यांनी अनेक वेळा छोट्या पडद्यावर आईची भूमिका साकारली आहे आणि त्यांच्यातील प्रेमळ आई नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे. त्यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांबरोबरच चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयातील सहजतेने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 3 वर्षांनंतर हिंदी मालिकेत परत येत असल्याचे वाचून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. 

Web Title: Savita Prabhune will appear in this 'new series'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.