Sarat fame rides and ballets are seen in the GST Express | सैराट फेम ​सल्या आणि बाळ्या दिसणार कॉमेडीची GST एक्सप्रेसमध्ये

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुशखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. आता या मंचावर प्रेक्षकांचे आणखी काही लाडके कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सैराट या चित्रपटामुळे सल्या आणि बाळ्या यांना  अमाप लोकप्रियता मिळाली. आता ते या कार्यक्रमात दिसणार आहेत. 
कॉमेडीची GST एक्सप्रेस या कार्यक्रमाद्वारे सल्या आणि बाळ्या प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहेत. प्रेक्षकांना हा भाग १४ आणि १५ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. दहीहंडी विशेष भागामध्ये GST च्या मंचावर सल्या आणि बाळ्याच्या म्हणजेच अरबाज शेख आणि तानाजी गालगुंडेच्या एन्ट्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन होणार यात काहीच शंका नाही. 
या कार्यक्रमासाठी तानाजी आणि अरबाज यांनी नुकतेच चित्रीकरण केले. त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवले. त्या दोघांनी संदीप पाठक यांच्यासोबत कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या दहीहंडी खास भागामध्ये अनेक दहीहंडी पथकं 
देखील आली होती. या दोघांनी या पथकाच्या गोविंदांसोबत हंडी देखील फोडली. संदीप, सल्या आणि बाळ्या तिघांनी मिळून पथकाच्या मुलांसोबत झिंगाट या लोकप्रिय गाण्यावर मनसोक्त डान्स देखील केला. सल्या आणि बाळ्या या दोघांना या कार्यक्रमात एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सल्या कृष्ण तर बाळ्या पेंद्याची भूमिका करणार आहे तसेच संदीप पाठक मावशीच्या रूपात दिसणार आहेत. या तिघांनीही मिळून मंचावर धुमाकूळ घातला.

Also Read : ‘संगीत म्हणजे माझ्यासाठी जीवन’ - अवधूत गुप्ते
Web Title: Sarat fame rides and ballets are seen in the GST Express
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.