Saraswati series Twist! | सरस्वती मालिकेमध्ये येणार ट्विस्ट !

सरस्वती मालिकेमध्ये आणि दुर्गा तसेच सरस्वतीच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या. सरस्वती – राघवची भेट होताता राहण, भुजंगच सरस्वती आणि देवाशिषचे लग्नं होत असतानाचं मोठं नाटकं रचण. देवाशिष आणि त्याच्या संपूर्ण परिवारासोबतच सरस्वतीला देखील हे पटवून देण्यात यशस्वी ठरण कि, ती त्याची बायको आहे आणि तो गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो तिच्या शोधात आहे. मग सरस्वतीचे वाड्यामध्ये भुजंगची पत्नी म्हणून जाणं. हि सगळी खेळी भुजंग अगदी सफाईदार पणे खेळत आला आहे. आता येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना सरस्वती आणि मोठ्या मालकांमधील प्रेमाचे काही क्षण बघता येणार आहेत. मोठे मालक म्हणजेच राघव जसे सरस्वतीवर प्रेम करायचा, तिची काळजी घ्यायचा हे सगळ पुन्हाएकदा घडणार आहे. या गोष्टी घडल्यानंतर सरस्वतीला आठवेल का कि राघवच तिचा नवरा आहे ? भुजंगची पत्नी हि आपली सरू आहे हे सत्य राघवला कळेल का ? आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत आहे ते आता घडणार आहे - सरस्वती आणि दुर्गा समोरासमो येणार आहेत. 

या आठवड्यामध्ये राघव सरस्वतीला इस्पितळातमध्ये घेऊन जाणार आहे. पण, राघव अनभिज्ञ आहे कि, तो दुर्गाला नाही तर सरस्वतीलाच इस्पितळात घेऊन जातो आहे. जिथे त्याला हे सत्य कळणार आहे कि, सरस्वती आता फक्त काही महिनेच आपल्यासोबत असणार आहे, जे ऐकून राघव पूर्णपणे खचून जाणार आहे. सरस्वती खूप मोठ्या प्रश्नात आहे कि, राघव तिची इतकी सेवा, काळजी का करत आहे ? तिला कुंकू लावणे, खाऊ घालणे. पण, प्रेक्षकांसाठी सरू आणि मोठ्या मालकांमधील हे क्षण पुन्हा बघणे नक्कीच येणाऱ्या भागांमध्ये काय होणार आहे ? याबद्दलची उत्सुकता वाढवणारे असणार आहेत.

सरस्वती या मालिकेत तितिक्षा तावडे सरस्वतीची भूमिका साकारत असून राघवच्या भूमिकेत प्रेक्षकांना आस्ताद काळेला पाहायला मिळत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तितिक्षा तावडेची ही पहिलीच मालिका असली तरी तिच्या पहिल्याच मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. 
Web Title: Saraswati series Twist!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.