बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या सपना चौधरीने भावाच्या लग्नात असे काही ठुमके लावले की, पाहुणेमंडळी दंग झाली. सध्या सपनाचा हा व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला असून, त्यास मोठ्या प्रमाणात बघितले जात आहे. गेल्या शनिवारी हरियानवी डान्सर सपनाचा भाऊ करण चौधरी याचे लग्न पार पडले. लग्नात सपना खूपच ग्लॅमरस लूकमध्ये बघावयास मिळाली. जेव्हा नवरदेवाची वरात निघाली तेव्हा मात्र सपनाने चांगल्याच अदा दाखविल्या. तिने जोरदार ठुमके लावत पाहुणे मंडळींची बोलतीच बंद केली. सपना चौधरीने डार्क पिंक कलरचा लहेंगा घातला होता. त्यावर लाइट ब्ल्यू कलरची ओढणी कॅरी केली होती. या अंदाजात ती खूपच सुंदर दिसत होती. जेव्हा सपना नाचत होती, तेव्हा उपस्थितांकडून टाळ्या वाजवून तिला दाद दिली गेली. विशेष म्हणजे सपनाचा डान्स बघून भावाच्याही चेहºयावर हास्य फुलले होते. या लग्नात बिग बॉस ११ मध्ये सपनासोबत सहभागी झालेली अर्शी खान, महजबी आणि आकाश ददलानी हेदेखील बघावयास मिळाले. तसेच लग्नात संपूर्ण गाव सहभागी झाले होते. शिवाय राज्यभरातून अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी लग्नात हजेरी लावली होती. दरम्यान, बिग बॉसच्या शोबाहेर पडल्यानंतर सपना चौधरीला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. सध्या ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. शिवाय बॉलिवूडमधून तिला अनेक आॅफर्सही मिळत आहेत. याव्यतिरिक्त ती देशाच्या विविध भागांमध्ये शो करीत आहे. सपनाचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. 
Web Title: Sapna Chaudhary took the brother's wedding strongly, and video Viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.