Sanket Bhosale entertains as Salman Khan on The Voice | 'दि व्हॉईस'च्या मंचावर संकेत भोसलेने हुबेहुब साकारला दबंग खान
'दि व्हॉईस'च्या मंचावर संकेत भोसलेने हुबेहुब साकारला दबंग खान

स्टार प्लस वाहिनीवरील 'दि व्हॉईस'मधील दुसऱ्या फेरीत स्पर्धक आता एकमेकांना कडवी स्पर्धा देत आहेत. परीक्षक अदनान सामी, हर्षदीप कौर, कनिका कपूर आणि अरमान मलिक यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले आहे. प्रोफेशनने कॉमेडियन असलेल्या संकेत भोसलेला या शोमध्ये प्रेक्षक आणि स्पर्धकांचे मनोरंजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

संकेत अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिताऱ्यांची हुबेहूब नक्कल करतो. स्टार प्लसच्या दि व्हॉईसच्या मंचावर तो सलमान खान बनून आला होता. त्याने सलमान एवढा उत्तम प्रकारे साकारला की त्याला पावलोपावली टाळ्‌या आणि हशा मिळत होता. त्याच्या ॲक्टमध्ये संजय दत्त आणि फरहान अख्तरसोबत अन्य कलाकारांचाही समावेश होता. नंतर त्याने स्पर्धकांना उत्तम नकलाकार कसे बनावे तेही शिकवले. अर्थातच, स्पर्धकांना ते फारसे काही जमले नाही पण सर्वांना नक्कीच खूप मजा आली. स्टार प्लसवरील दि व्हॉईस उत्तम परफॉर्मन्सेस आणि मस्तीने भरलेल्या क्षणांसह प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे.

जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील १८० देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हा शो दाखल झाला आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून आहेत. 


Web Title: Sanket Bhosale entertains as Salman Khan on The Voice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.