Sanjay Kapoor is doing a lot of fun after 13 years | संजय कपूर करतोय तब्बल १३ वर्षांनी कमबॅक

अमिताभ बच्चन आणि सलमान खाननंतर आणखी एक अभिनेता छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.  हा अभिनेता तब्बल १३ वर्ष  इंडस्ट्रीपासून दूर राहिला. आम्ही बोलतो आहे  संजय कपूरबद्दल, मिळालेल्या माहितीनुसार संजय कपूर लवकरच छोटया पडद्यावर काम करणार आहे.  बॉलिवूडलाईफच्या रिपोर्टनुसार  २३ ऑक्टोबरपासून स्टारप्लसवर प्रसारित  होणाऱ्या  'दिल संभल जा जरा' या मलिकेत संजय कपूर दिसणार आहे. 

स्टार प्लसने या मालिकेचा फर्स्ट लूक आणि प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामालिकेत संजय कपूर  अभिनेत्री स्मृती कालरा हिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय आणि स्मृतीबरोबर निकी अनेजा वालिया सुद्धा या मालिकेत दिसणार आहे.

'दिल संभल जा जरा' चे निर्माते प्रसिद्ध फिल्ममकेर विक्रम भट्ट आहेत. या मालिकेचे नाव इम्रान हाश्मीच्या चित्रपट मर्डर २ च्या गाण्यातून घेतले आहे. सर्वात महत्त्वाचे की अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर २००३-०४ नंतर तब्बल १३  टीव्हीवर कॉम बॅक करत आहे. 15 वर्षापूर्वी संजय कपूरने विक्रम भट्टला दिलेल वनच पाळले आहे. संजय कपूर आणि शाहरूख खान तसेच करिष्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘शक्ती’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर संजय कपूरबरोबर नवा चित्रपट करण्याची इच्छा विक्रम भटने व्यक्त केली होती.दुर्दैवाने या दोघांना पसंत पडेल अशी पटकथा इतक्या वर्षांत त्यांना मिळाली नाही. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर दोघांना अशी कथा सापडली की दोघे एकत्र काम करणार आहेत.    

संजय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात 1995 साली आलेल्या प्रेम चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती तब्बू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर तो दिसला बॉलिवूड डिवा माधुरी दीक्षितसोबत राजामध्ये. हा चित्रपट संजय कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर रातो-रात तो स्टार बनला. मात्र या चित्रपटानंतर संजयला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर त्यांने तीन चित्रपटांची देखील निर्मिती केली.  
Web Title: Sanjay Kapoor is doing a lot of fun after 13 years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.