Sanjay Dutt shares these special things about children | संजय दत्तने मुलांविषयीच्या या खास गोष्टी केल्या शेअर

लोकप्रिय मागणी वरून, कलर्सने एंटरटेनमेंट की रात@9 या वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधक शोची दुसरी आवृत्ती आणली आहे.गेल्या सीझनमध्ये या शोला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि आता तो यावेळी रात्री 9 वाजताच्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येणार आहे.या सीझनचा सुरूवातीचा एपिसोड सुरू करताना बॉलिवूडचा लाडका संजय दत्त हा पहिला अतिथी असणार आहे आणि तो होस्ट सौम्या टंडन व नेहा पेंडसे, कॉमेडिवीर मुबिन सौदागर,बलराज आणि बालकलाकार दिव्यांश यांना सामील होणार आहे.तुरूंगातील दिवसांविषयी आणि त्याच्या कुटुंबात राहताना मिळणाऱ्या आनंदा विषयी संजय दत्त अगदी प्रांजळपणे बोलला.“येरवड्यात असताना मी आरजे झालो होतो आणि तेथील बरेच सहकारी हे माझे चाहते होते आणि त्यांना माझे बोलणे ऐकायला आवडत असे. माझी शिक्षा सुसह्य करणारे आणि माझा वेळ आनंदात घालविण्यासाठी त्यांनी खूप मदत केली होती,”असे यावेळी त्याने सांगितले.मुलांविषयी विचारले असता, त्याच्या डोळ्यात एक चमक आली आणि तो म्हणाला, “माझ्या मुलांनी आधी शिकून पदवी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर त्यांना जे काही करायचे असेल त्यात मी त्यांना पाठिंबा देईन.माझे गणित अतिशय वाईट होते, त्यामुळे मी त्यांना ते शिकवत नाही, पण क्राफ्ट आणि पेंटिंग करण्यात मी त्यांना मदत करतो.”अशा अनेक गुपितांच्या उलगडण्यातून टीमला या सुपरस्टार सोबत हास्य आणि गंमत अनुभवायला मिळणार आहे.

‘अलोन’ या चित्रपटानंतर अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा हॅण्डसम हबी करण सिंह ग्रोव्हर यांच्या हाताला काम नव्हते. खरे तर लग्नाआधी बिपाशाची बॉलिवूडमध्ये नाही म्हणायला ब-यापैकी चलती होती. पण लग्नानंतर अचानक बिपाशा मागे पडली. काहींच्या मते, लग्नानंतर काही  निर्माते - दिग्दर्शक बिपाशाकडे आॅफर घेऊन गेलेत. पण बिपाशाने म्हणे, स्वत:सोबत हबी करणलाही कास्ट करावे, अशी अट त्यांच्यापुढे ठेवली. मग काय, बिपाशाही नको अन् करणही नको म्हणून पुढे बिप्सला आॅफर्स मिळणेचं बंद झाले. तेव्हापासून बिप्स व करण दोघांकडेही काम नव्हते. पण आता या ‘मंकी लव्हर्स’ला (बिप्स व करणला ‘मंकी लव्हर्स’ म्हणून ओळखले जाते.) एक प्रोजेक्ट मिळालाय. होय, एका टीव्ही शोमधून बिप्स व करण दोघेही अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत वापसी करणार आहेत. कलर्सवरील ‘एंटरटेनमेंट की रात - द एक्सटेंशन’मध्ये बिपाशा व करण यांची वर्णी लागली आहे. स्वत: बिपाशाने याचा खुलासा केला. 

Web Title: Sanjay Dutt shares these special things about children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.