Sandeep Pathak, on Comedy's set of GST Express, has got two moments of rest | ​कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या सेटवर सदाफुले म्हणजेच संदीप पाठक यांना मिळाले विश्रांतीचे दोन क्षण

कलर्स मराठीवरील कॉमेडीची GST एक्सप्रेस हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना आशिष पवार, कमलाकर सातपुते, किशोर चौघुले, अदिती सारंगधर आणि प्राजक्ता हनमघर हे त्यांचे लाडके विनोदवीर पाहायला मिळत आहेत. हे विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. या कार्यक्रमातील या विनोदवीरांसोबतच या कार्यक्रमातील सूत्रसंचालक देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत.
कॉमेडीची GST एक्सप्रेसचे सूत्रसंचालन करणारे संदीप पाठक आणि प्रियदर्शन जाधव यांच्या आगळ्यावेगळ्या सूत्रसंचालनाच्या पद्धतीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एखादी मालिका किंवा कार्यक्रम हा ठरावीक तासांचा असला तरी त्यासाठी या कार्यक्रमातील कलाकारांना अनेक तास चित्रीकरण करावे लागते. काही वेळा तर दिवसातील १०-१२ तास चित्रीकरणात जातात. त्यांना या चित्रीकरणाच्या दरम्यान थोडा देखील आराम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे दृश्याच्या दरम्यान थोडासा वेळ मिळाला तर ते काही मिनिटांची पॉवर नॅप घेतात. अशीच पॉवर नॅप घेताना नुकताच संदीप पाठक दिसला.
कॉमेडीची GST एक्सप्रेस मधील सदाफुले म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका संदीप पाठक याला नुकतेच चित्रीकरणाच्या दरम्यान काही क्षण विश्रांतीचे मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर उपयोग देखील करून घेतला. सेटवर लाईट्स चेक होत होते आणि बाकीचे कलाकार देखील स्टेजवर आले नव्हते. त्यामुळे संदीपला थोडासा वेळ मिळाला आणि त्याने झोप काढली.
संदीप विश्रांती करत असताना त्याने डोक्यावर छत्री देखील घेतली होती. त्याला झोपलेले पाहाता त्याच्या टीममधील लोकांनी लगेचच त्याचा हा फोटो टिपला.
GST म्हणजे गायब सगळं टेन्शन. ही एक्सप्रेस सगळ्यांना १०० टक्के हसण्याची हमी देत आहे. या कार्यक्रमामध्ये गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते मार्गदर्शकाच्या अथवा परीक्षकाच्या भूमिकेत नव्हे तर कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक आहे. या कार्यक्रमाची निर्मिती संतोष काणेकर यांच्या अथर्व थिएटर्सने केली आहे. तसेच ज्ञानेश भालेकर यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे.
कॉमेडीची GST एक्सप्रेस हा कार्यक्रम काहीच दिवसांपूर्वी सुरू झाला असून खूपच कमी वेळात प्रेक्षकांचे प्रेम या कार्यक्रमाला मिळाले आहे. 

Also Read : प्राजक्ता हनमघर अडकली लग्नबंधनात
Web Title: Sandeep Pathak, on Comedy's set of GST Express, has got two moments of rest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.