Sanam Johar-Abigail Pandey will be seen in 'Dance Champions' | ​‘डान्स चॅम्पियन्स’मध्ये झळकणार सनम जोहर-आबिगाईल पांडे

‘डान्स प्लस’या कार्यक्रमानंतर नृत्यावर आधारित आणखी एक डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांना स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा या कार्यक्रमाl परीक्षककाची भूमिका साकारणार असून या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ‘चॅम्पियन ऑफ डान्स चॅम्पियन्स’ असे या कार्यक्रमाचे नाव असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राघव जुयाल करणार आहे. राघवने डान्स प्लस या कार्यक्रमात केलेल्या सूत्रसंचालनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. आपल्या खोचक, पण मिश्किल टिप्पणीने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना तो खळखळून हसवणार यात काही शंकाच नाही. 
या कार्यक्रमात डान्स प्लस, नच बलिये, झलक दिखला जा, डान्स इंडिया डान्स या आतापर्यंतच्या सगळ्या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोमधील विजेते आणि उपविजेते डान्स चॅम्पियन्स होण्यासाठी एकमेकांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धकांमध्ये सनम जोहर आणि आबिगाईल पांडे ही ‘नच बलिये’ कार्यक्रमातील सर्वात लोकप्रिय जोडीही सहभागी होणार आहे. या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले होते. त्यामुळे हीच जोडी विजेतेपद मिळवेल असे सगळ्यांना वाटत होते. परंतु त्यांचे विजेतेपद थोडक्यात हुकले. पण त्यांनी सर्व प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले होते. आता ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या आगामी नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात ते आव्हानवीर म्हणून सहभागी होत आहेत.
सनम जोहर आणि आबिगाईल पांडे या जोडीने ही स्पर्धा केवळ जिंकण्याचा निर्धारच केलेला नाही, तर त्या दिशेने त्यांनी आपल्या प्रयत्नांना सुरुवातही केली आहे. यावेळी अचूक नृत्य सादर करण्यासाठी हे दोघेही दिवसरात्र नृत्याचा सराव करत आहेत. चॅम्पियन ऑफ डान्स चॅम्पियन्स या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला या महिन्याच्या अखेरपर्यंत तरी सुरुवात होणार नसली तरी सनम आणि आबिगाईल हे दोघेही रोज निदान एक तासभर तरी नृत्याचा सराव करत आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमातील आपल्या स्पर्धकांना चांगलीच टक्कर देणार यात काही शंकाच नाही.

Also Read : सलमान खानसोबतच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणारः रेमो डिझोझा

Web Title: Sanam Johar-Abigail Pandey will be seen in 'Dance Champions'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.