संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रंगणार गडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:00 AM2019-04-05T08:00:00+5:302019-04-05T08:00:00+5:30

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगणार आहे. संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालं होतं.

Sambhaji Coronation ceremony will be on fort | संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रंगणार गडावर

संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रंगणार गडावर

googlenewsNext
ठळक मुद्देअनाजी पंतांनी हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून बरेच प्रयत्नही केले राज्याभिषेकानंतर शंभूराजेंनी बऱ्याच मोहिमा फत्ते केल्या

येत्या आठवड्यात 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगणार आहे. संभाजी महाराजांचं मंचकारोहण झालं होतं. शंभूराजेंनी मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले. सलग ५ दिवस आणि रात्र घोडदौड करून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. सुरतेच्या लुटीपेक्षा ३ पट लूट जमा केली. शंभूराजेंनी या विजयानंतर आता राज्याभिषेक करून घ्यावा, ही त्यांच्या निकटवर्ती यांची इच्छा होती. संभाजी महाराज अगोदर या राज्याभिषेकाला नाहीच म्हणत होते. अनाजी पंतांनी हा राज्याभिषेक होऊ नये म्हणून बरेच प्रयत्नही केले. पण तरीही राज्याभिषेकाचा सोहळा येत्या आठवड्यात रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर आता रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होणार. एकीकडे औरंगजेब संभाजी महाराजांना पाण्यात पाहतोय. बुऱ्हाणपुराच्या विजयानंतर औरंगजेब मनातून घाबरलाय.

अकबर मात्र संभाजी महाराजांना खलिते पाठवतोय. अकबराला शंभूराजांशी मैत्री करायचीय. राज्याभिषेकानंतर शंभूराजेंनी बऱ्याच मोहिमा फत्ते केल्या. येत्या एपिसोडसमध्ये हे सर्व पाहायला मिळणार आहे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक विशेष सप्ताह प्रेक्षकांना ४ एप्रिल ते १२ एप्रिल रात्री ९ वाजता झी मराठीवर अनुभवता येईल. 

डॉ. अमोल कोल्हे यांचा काही दिवसांपूर्वी वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते आपल्याला जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मोठ्या संख्येने त्यांच्या फॅन्सनी या फोटोला लाईक्स केले होते. 

Web Title: Sambhaji Coronation ceremony will be on fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.