Salman's 'That' Kiss transforms the destiny of Yogita, now it will be done! | सलमानच्या 'त्या' Kiss ने पालटले योगिताचे नशीब, आता करणार हे काम!

कोणत्या गोष्टी आपलेल्या चांगल्या संधी देवून जाईल हे काही सांगता येत नाही. अगदी असेच घडले योगिता बिहानीसोबत.'दस का दम' शोच्या प्रोमोमध्ये अगदी काही सेकंदासाठी योगिताची झलक पाहायला मिळते. सलमान योगिताला प्रश्न विचारतो.विचारेलल्या प्रश्नाचे अचुक उत्तर दिल्यामुळे सलमान तिच्या गालावर किस करतो असे प्रोमोत पाहायला मिळते. सध्या दस का दम शोला सलमान खान होस्ट करणार असल्यामुळे तुफान चर्चा आहे.शो सुरू होण्याआधीच प्रोमोमुळे या शोची रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे.मात्र हा प्रोमो योगितासाठी टर्निंग पाईंट ठरला आहे. योगिताला सलमान खान किस करतो हा सीन सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातच याच प्रमोमुळे ती प्रकाशझोतात आल्यामुळे तिला थेट एकता कपूरनेच ही ऑफर दिली आहे.नवीन मालिका 'दिल ही तो है' या मालिकेत आता योगिता झळकणार आहे.'दिल ही तो है' ही मालिका 'कभी खुशी कभी गम' सिनेमावर आधारित असणार आहे.इतकेच नव्हेतर करिअरच्या सुरुवातीलाच योगिताला सुपरस्टार सोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे इतर संधी मिळत गेल्या.अलिकडेच नागार्जुनसोबतही योगिताने  जाहिरातीमध्येही काम केले आहे. प्रोमो ते थेट मालिकेत झळकणार म्हटल्यावर योगिताची अवस्थाही आज मै उपर आँसमा निचे अशीच झाल्याचे पाहायला मिळत आहे. करण जोहरने दिग्दर्शित केलेला 'कभी खुशी कभी गम' प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे.'दिल ही तो है' असे या मालिकेचे नाव असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. ​योगिता बिहानीची भूमिका काजोलच्या भूमिकेशी मिळतीजुळती असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत आतापर्यंत गितांजली टिकेकर, फरीदा दादी, ओंकार कपूर या कलाकारांची वर्णी लागली आहे. 
या मालिकेविषयी योगिता सांगते,“ ही मालिका मिळाल्यामुळे माझे स्वप्नच जणू साकार झाले आहे असे मला वाटायला लागले आहे. सलमानसोबत प्रोमो आणि आता भारतीय टेलिव्हिजनची साम्राज्ञी एकता कपूरच्या मालिकेत भूमिका साकारायला मिळत असल्याने योगिता प्रचंड खूश आहे. यापेक्षा आयुष्यात चांगले काही होऊ शकते असे मला वाटतच नाही .कोणत्याही नवीन कलाकारासाठी एकता कपूरच्या मालिकेत काम मिळणे हा सगळ्यात मोठा मंच असतो. मी खूप उत्साहित आहे त्याचबरोबर थोडी काळजी देखील वाटते आहे. मी काही काळापासून अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्यासाठी हा दुहेरी धमाका आहे. पलक ही एक आनंदी आणि ठाम स्त्रीवादी मते असणारी व्यक्ती आहे. मी चित्रीकरण सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहते आहे आणि मला आशा वाटते की प्रेक्षकांना देखील माझे काम आवडेल.” 

Web Title: Salman's 'That' Kiss transforms the destiny of Yogita, now it will be done!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.