Salman Yousuf Khan appears in the TV show 'High fever ... dance new wave' | ​&TV च्या 'हाय फीवर... डान्स का नया तेवर'मध्ये सलमान युसुफ खान दिसणार या भूमिकेत
​&TV च्या 'हाय फीवर... डान्स का नया तेवर'मध्ये सलमान युसुफ खान दिसणार या भूमिकेत
&TV चा डान्स रिअॅलिटी शो 'हाय फीवर... डान्स का नया तेवर'मध्ये प्रेक्षकांना आणखी एक परीक्षक पाहायला मिळणार आहे. या परीक्षकाची कार्यक्रमात लवकरच एंट्री होणार आहे. कोरिओग्राफर आणि अभिनेता सलमान युसुफ खान आपल्या जादुई नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्वत: रिअॅलिटी शो मधून प्रसिद्धीझोतात आलेला सलमान अभिनेत्री लारा दत्ताची जागा घेणार आहे. लारा दत्ता या शोमध्ये फक्त स्पर्धक जोड्यांची मार्गदर्शक आणि मित्र म्हणूनच नाही तर एक अस्सल एंटरटेनर म्हणूनही प्रसिद्ध आहे.पण या शोच्या मागील आठवड्याच्या एपिसोडमध्ये लारा दत्ताला भावनिक आणि साश्रू निरोप दिला गेला. तिने परीक्षकाचे पद वैयक्तिक कारणांसाठी आणि कामांसाठी सोडले आहे. आता सलमान स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहे. सलमानने स्वतः त्याच्या करियरची सुरुवात एका रिअॅलिटी शोमधून झाली. या कार्यक्रमाचा भाग होण्याविषयी तो सांगतो, “रिअॅलिटी शोचे परीक्षक म्हणून काम करण्याचा माझा कधीही विचार नव्हता आणि माझ्या आयुष्यात नंतरच्या टप्प्यावर मला हे करता येईल असे मला वाटत होते. &TV ने मला ही संधी दिल्यावर मला खूप आश्चर्य वाटले आणि ती घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या शोची संकल्पना आणि स्पर्धकांच्या गोष्टींनी माझ्यामध्ये उत्साह निर्माण केला आहे आणि डान्स आणि नाते या दोन्ही गोष्टी एकत्र येणे पाहणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे काहीतरी नवीन आणि वेगळे आहे आणि मी पाहत असलेल्या इतर रिअॅलिटी शोसारखे तांत्रिक नाही. या शोवर माझे काही लाडके डान्सर्स आहेत आणि त्यांची सादरीकरणे अत्यंत सुंदर आहेत, असे मला वाटते. अहमद खान सरांसोबत बसून परीक्षण करणे ही गौरवाची बाब आहे कारण माझे गुरू रेमो डिसूझा यांचे ते गुरू आहेत आणि त्यामुळे माझेही गुरू आहेत. मला त्यांचे काम आवडते आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. मी ईशा गुप्ताचाही खूप मोठा चाहता आहे.

Also Read : ‘या’ दोघांशिवाय हृतिक रोशन डान्सर बनूच शकला नसता!
Web Title: Salman Yousuf Khan appears in the TV show 'High fever ... dance new wave'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.