Salman Khan's niece will be seen in Bigg Boss | ​सलमान खानची भाची झळकणार बिग बॉसमध्ये

सलमान खानची भाची झळकणार बिग बॉसमध्ये हे ऐकून तुम्हाला नक्कीच बसला असेल. पण सलमानची ऑफ स्क्रीन नव्हे तर ऑन स्क्रीन भाची प्रेक्षकांना बिग बॉस या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. हम साथ साथ है या मालिकेत निलम आणि सलमान हे आपल्याला भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात निलमला एक मुलगा असल्याचे दाखवण्यात आले होते. या मुलीची व्यक्तिरेखा जोया अफरोजने साकरली होती. जोया आता मोठी झाली असून एक प्रसिद्ध मॉडेल बनली आहे. सलमानची हीच ऑनस्क्रीन भाची जोया प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसमध्ये आता दोन वाईल्ड कार्ड एंट्रीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसच्या घरात लवकरच नतालिया काय आणि जोया अफरोज जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नतालिया ही लंडनमधील प्रसिद्ध मॉडेल आहे. नतालिया पेक्षा जोयाच्या बिग बॉसमध्ये जाण्याच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण जोया ही सलमानच्या खूप जवळची असल्याचे म्हटले जाते. जोया नुकतीच एका स्टोरच्या इव्हेंटला उपस्थित होती. त्यावेळी तिला तिच्या बिग बॉसच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी सलमानसोबत काम केले आहे. ते खूपच चांगले आहेत. त्यांनी कोणाला कोणते काम सांगितले तर त्यांना कोणीही नकार देणार नाही. त्यामुळे सलमान यांनी मला बिग बॉसमध्ये जाण्यासाठी स्वतः बोलावले तर मी लगेचच जाईन.

zoya afroz

जोयाने हम साथ साथ है सोबतच कुछ ना कहो या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. आता ती स्वीटी वेड्स एनआरआई या चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसच्या या पर्वात सध्या अर्शी खान, हितेन तेजवानी, हिना खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता यांसारखे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या या सिझनमध्ये पहिल्या सिझनपासून प्रेक्षकांना वादविवाद पाहायला मिळत आहेत.  

Also Read : बॉक्स ऑफिसवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनचा येणार आमने-सामने
Web Title: Salman Khan's niece will be seen in Bigg Boss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.