Salman Khan's arrest, Jubair Khan was arrested by crime branch! | सलमान खानच्या अटकेचे स्वप्न बघणाऱ्या जुबेर खानलाच क्राइम ब्रांचने केली अटक!

बिग बॉस सीजन-११ चा स्पर्धक राहिलेला जुबेर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बिग बॉस या शोमध्ये जुबेरला पहिल्याच आठवड्यात बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. यावेळी सलमान खानने त्याचा चांगलाच क्लास घेतला होता. यावरून जुबेरने सलमान खानविरूद्ध पोलीस तक्रारही दाखल केली होती. परंतु सलमानला अटक होत नसल्याने तो त्याच्याविरुद्ध वाटेल ते आरोप करीत होता. परंतु आता येत असलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या अटकेचे स्वप्न बघणाºया जुबेरलाच मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. होय, बळजबरीने हफ्ता वसुली प्रकरणी जुबेरवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

पाच महिन्यांपूर्वी बिग बॉस या शोमध्ये आल्यानंतर जुबेरने बिग बॉसचा होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याविरोधात मुंबईच्या एंटॉप हिल आणि लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुबेरने आरोप केला होता की, शोचा होस्ट सलमान खानने त्याच्याबद्दल अपशब्दांचा वापर केला. त्याचबरोबर सलमानने जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले होते. यावेळी जुबेरने कलर्स वाहिनीविरोधात कारवाई करणार असल्याचेही म्हटले होते. 

नवभारत टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार मुंबई क्राइम ब्रांचच्या सूत्रानुसार अशी माहिती मिळाली की, त्यावेळी एक महिला जुबेर खानच्या मदतीसाठी पुढे आली होती, मात्र नंतर जुबेर खानला संशय आला की, ती महिलादेखील चॅनेलशी जोडलेली आहे. जुबेरवर आरोप करण्यात आला की, त्याने या महिलेचा नंबर गुन्हेगारी जगताशी संबंधित एका व्यक्तीला दिला. त्यानंतर या व्यक्तीने पाकिस्तानात बसलेल्या उस्मान चौधरी नावाच्या व्यक्तीला तो नंबर फॉरवर्ड केला. उस्मान त्या महिलेला गेल्या ३ नोव्हेंबर २०१७ पासून दाऊद, छोटा शकील, फहीम मचमच यांच्या नावाने घाबरवित असून, तिच्याकडे तब्बल एक कोटी रूपयांची मागणी केली आहे. 

रिपोर्टनुसार, याप्रकरणी क्राइम ब्रांचच्या टीमने काही काळापूर्वीच हरीश यादव, बिलाल शमसी, जगबीर सिंह यांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीनंतर दोन दिवसांनी हैदराबाद आणि सिकंदराबाद येथून रुहुल इस्लाम, मिर्जा बेग आणि अबरार चिरागुद्दीन नावाच्या आरोपींना अटक केली आहे. या तीन आरोपींपैकी एका आरोपींच्या कॉल डिटेल्समध्ये जुबेर खानचा नंबर मिळाला आहे. त्यामुळे जुबेर खानलाही आता अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जुबेर खानला याप्रकरणी सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला क्राइम ब्रांचकडे सोपविले आहे. वास्तविक जुबेरच्या वकिलांचे म्हणणे आहे की, क्राइम ब्रांचने केवळ संशयावरून जुबेरला अटक केली आहे. 
Web Title: Salman Khan's arrest, Jubair Khan was arrested by crime branch!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.